मुख्य सामग्री पर जाएँ

आचारसंहितेमुळे 'स्थायी समिती'चे काम बंद

जिल्हाधिकाऱ्यांना बैठकीसाठी केली विनंती

पघ
प्रशिक घस्ते

1 मिनट पठन

जिल्हाधिकाऱ्यांना बैठकीसाठी केली विनंती

निलेश राऊत
पुणे
: पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींतून निवडून दिल्या जाणाऱ्या एका जागेसाठी विधानपरिषदेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या स्थायी समिती, सर्वसाधारण सभेसह विशेष समित्यांचे कामकाज बंद असून, कामे रखडणार आहेत. त्यामुळे या काळात पालिकेची स्थायी समितीची बैठक घेता येईल का, याबाबत पालिकेने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे मार्गदर्शन मागितले आहे.

आगामी काळात शहरात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आगमन होणार आहे. यासाठी काही विकासकामे करणे आवश्यक आहेत. तसेच शहरात पावसाळ्यापूर्वीची कामे, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, रस्त्यांवरील खड्डे, पाणी साचण्याच्या समस्या आणि नव्याने समाविष्ट झालेल्या गावांतील नागरी सुविधा यांसारख्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.

अत्यावश्यक कामांसाठी बैठक
त्यामुळे केवळ अत्यावश्यक विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी स्थायी समितीची बैठक घेता येईल का? तसेच त्यासाठी कोणती कार्यपद्धती अवलंबवावी याबाबत स्पष्ट मार्गदर्शन करण्याची विनंती, पालिकेच्या नगरसचिव योगिता भोसले यांनी जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.

महाराष्ट्र पालिका स्थायी अधिनियमातील तरतुदीनुसार समितीची बैठक महिन्यातून एकदा घेणे आवश्यक आहे. आर्थिक बाबींवरील निर्णयदेखील या समितीमार्फत घेतले जातात. गुरुवारी स्थायी समितीची पूर्वनियोजित बैठक होती. मात्र, आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक तहकूब केली गेली होती. त्यामुळे आता पालिकेने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे मार्गदर्शन मागितले आहे.

शेयर करें