मुख्य सामग्री पर जाएँ

खराडीत 'सेफ्टी डोअर’ची हलगर्जी भोवली

उघड्या दरवाज्यातून चोरट्याचा शिरकाव, २ लाखांचे दागिने लंपास

पघ
प्रशिक घस्ते

1 मिनट पठन

खराडीत 'सेफ्टी डोअर’ची हलगर्जी भोवली

उघड्या दरवाज्यातून चोरट्याचा शिरकाव, २ लाखांचे दागिने लंपास

पुणे: खराडी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये घराचा दरवाजा अर्धवट उघडा असल्याचे पाहून चोरट्याने घरात प्रवेश केला आणि कपाटातील २ लाख १८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. भरदिवसा घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, याप्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी खराडी येथील ‘यशवीन ओरीझॉनते’ सोसायटीत राहणाऱ्या एका ३६ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०५ (अ) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही घटना २१ एप्रिल २०२६ रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी दीडच्या सुमारास घडली.

अशी झाली चोरी
मिळालेले माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर खराडीतील पंचशील टॉवरसमोर असलेल्या ‘यशवीन ओरीझॉनते’ सोसायटीत आहे. मंगळवारी सकाळी फिर्यादी यांच्या घराचा मुख्य दरवाजा अनावधानाने अर्धवट उघडा राहिला होता. घराचा दरवाजा उघडा असल्याचे पाहून दबा धरून बसलेल्या अज्ञात चोरट्याने शिताफीने घरात प्रवेश केला. कोणाचेही लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्याने थेट बेडरूम गाठले आणि तिथल्या कपाटातून २ लाख १८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून पोबारा केला.

सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू
काही वेळाने कपाटातील दागिने गायब असल्याचे फिर्यादींच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने खराडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. भरवस्तीत आणि सुरक्षा रक्षक असलेल्या सोसायटीत ही चोरी झाल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीस आता सोसायटीच्या परिसरातील आणि इमारतीमधील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून संशयित आरोपीचा शोध घेत आहेत.

पोलीस अंमलदार खरपुडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

शेयर करें