आंबा आला रे आला!
पणन मंडळामार्फत महोत्सवाचे पुण्यात आयोजन
1 मिनट पठन

पणन मंडळामार्फत महोत्सवाचे पुण्यात आयोजन
पुणे: महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व पुणे जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ या संकल्पनेअंतर्गत पीएमटी बस डेपो शेजारी मार्केटयार्ड, पुणे येथे आंबा महोत्सव-२०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्धाटन राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते ११ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता करण्यात येणार आहे.

या महोत्सवात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर व ठाणे या कोकणातील जिल्ह्यांमधील जीआय मानांकन प्राप्त हापूस आंब्यासह केशर, पायरी व इतर वाणांचे आंबे उपलब्ध असणार आहेत.
मार्केटयार्ड येथे सुमारे ६० स्टॉल्सद्वारे थेट विक्रीची व्यवस्था करण्यात आली असून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना दर्जेदार आंबे वाजवी दरात मिळण्याचा उद्देश आहे. हा आंबा महोत्सव सलग २५ व्या वर्षी आयोजित करण्यात येत असून १० जून २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. ग्राहकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पणन मंडळाचे सरव्यवस्थापक विनायक कोकरे यांनी केले आहे.
The mango has arrived
