मुख्य सामग्री पर जाएँ

Thane Tadipar News : तडीपार आरोपीच्या आवळल्या मुस्क्या, 20 वर्षीय शाहबाज पोलिसांच्या ताब्यात

•पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिले तडीपारचे आदेश

व
विवेक

1 मिनट पठन

Thane Tadipar News

•पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिले तडीपारचे आदेश

ठाणे :-पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी शहरातील तडीपार गुंडास अटक करून जेरबंद करण्याचे आदेश ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाचे हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहे. चितळसर पोलिसांनी अशाच एका तडीपार आरोपीला आहे. तडीपार आरोपी शाहबाज मकबुल हमीद खान (20 वर्ष) अटक करण्यात आले आहे.

शाहबाज मकबुल हमीद खान हा ठाण्याच्या धर्मवीर नगर परिसरात राहणार असून याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे त्याच्या या कृतीमुळे पोलिसांनी त्याला 26 सप्टेंबर 2023 रोजी ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड व पालघर या जिल्ह्यातून 18महिन्याच्या कालावधी करिता तडीपार करण्याचे आदेश पोलीस उप आयुक्त परिमंडळ 05 यांनी दिले होते. 23 मे 2024 रोजी तडीपारी चा कालावधी पूर्ण न करता शहरात फिरत होता. पोलिसांनी मनाई आदेश भंगप्रकरणी आरोपीला धर्मवीर नगर ठाणे येथून मध्यवर्ती गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी सरकार तर्फे दिलेला फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1),135,142 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपला अटक करण्यात आले आहे. घटनेबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साठे हे करत आहे.

हेही वाचा: Vidhan Parishad Lok Sabha Election : लोकसभेनंतर महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 4 जागांसाठी मतदान होणार, तारीख जाहीर

शेयर करें