मुख्य सामग्री पर जाएँ

Thane Crime News : ठाणे गुन्हे शाखेचा 'हायवे'वर सर्जिकल स्ट्राईक! 31 लाखांचा सव्वा क्विंटल गांजा जप्त; नाशिकच्या दोन तस्करांना बेड्या

Thane Crime Branch Latest News : खारेगाव टोलनाक्यावर सापळा रचून केली कारवाई | सॅन्ट्रो कारमधून चालली होती अंमली पदार्थांची वाहतूक | 123 किलो गांजासह वाहन पोलिसांनी घेतले ताब्यात

व
विवेक

1 मिनट पठन

Thane Crime News : ठाणे गुन्हे शाखेचा 'हायवे'वर सर्जिकल स्ट्राईक! 31 लाखांचा सव्वा क्विंटल गांजा जप्त; नाशिकच्या दोन तस्करांना बेड्या

Thane Crime Branch Latest News : खारेगाव टोलनाक्यावर सापळा रचून केली कारवाई | सॅन्ट्रो कारमधून चालली होती अंमली पदार्थांची वाहतूक | 123 किलो गांजासह वाहन पोलिसांनी घेतले ताब्यात

ठाणे :- ठाणे शहर पोलीस Thane Police News आयुक्तालयांतर्गत अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला मोठे यश आले आहे. नाशिकहून ठाणे-मुंब्रा परिसरात विक्रीसाठी आणला जाणारा 123 किलो गांजा गुन्हे शाखेने खारेगाव टोलनाक्यावर पकडला आहे. याप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील दोन सराईत तस्करांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण 30 लाख 91 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Thane Police Latest News

गोपनीय माहिती अन् अचूक सापळा

गुन्हे शाखा घटक-1 चे पोलीस शिपाई सागर सुरळकर यांना 24 फेब्रुवारी 2026 रोजी एक महत्त्वपूर्ण बातमी मिळाली होती."नाशिक-मुंबई महामार्गावरून एका कारमधून दोन इसम मुंब्रा परिसरात गांजा विकण्यासाठी येणार आहेत," अशी ही माहिती होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने खारेगाव येथील बंद असलेल्या टोलनाक्यावर कडेकोट सापळा रचला.

कारमधील 5 गोण्यांमध्ये होता गांजाचा साठा

भिवंडीकडून ठाण्याच्या दिशेने येणारी ह्युंदाई सॅन्ट्रो (क्र. MH-02-AU-5585) कार पोलिसांनी संशयावरून अडवली. कारची झडती घेतली असता, पोलिसांना 5 प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये पॅक केलेला 123 किलो 640 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. पोलिसांनी तत्काळ गांजा आणि गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली.

अटक करण्यात आलेले आरोपी

1) सागर गोविंद पवार (वय 33, रा. सिन्नर, जि. नाशिक)

2) धोंडीराम चैतु भागडे (वय 50, रा. इगतपुरी, जि. नाशिक)

पोलीस कोठडी आणि पुढील तपास

या दोन्ही आरोपींविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. (NDPS) कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गांजाचा मुख्य पुरवठादार कोण आहे आणि मुंब्र्यामध्ये तो कोणाला दिला जाणार होता, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

या पथकाची यशस्वी कामगिरी

अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले, उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, उपनिरीक्षक दीपक घुगे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने ही कारवाई यशस्वी केली.

शेयर करें