मुख्य सामग्री पर जाएँ

Thane Crime News : ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई; वकिलीसह पत्नीला 4500 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक

•कोर्टातील केस सुलभतेने चालवण्यासाठी आणि मानधनाच्या नावाखाली मागितली होती लाच; ठाणे एसीबीच्या पथकाची वर्तक नगर परिसरात यशस्वी कारवाई

व
विवेक

1 मिनट पठन

Thane Crime News : ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई; वकिलीसह पत्नीला 4500 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक

•कोर्टातील केस सुलभतेने चालवण्यासाठी आणि मानधनाच्या नावाखाली मागितली होती लाच; ठाणे एसीबीच्या पथकाची वर्तक नगर परिसरात यशस्वी कारवाई

ठाणे :- ठाण्यात एका वकिलास आणि त्याच्या पत्नीला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ जेरबंद केले आहे. कोर्टात सुरू असलेली केस सुरळीत चालवण्यासाठी आणि कागदपत्रांच्या बदल्यात 4500 रुपयांची लाच उकळल्याप्रकरणी ही धडक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे ठाणे न्यायालयीन आणि कायदेशीर वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकी काय आहे घटना?

तक्रारदार हे व्यवसायाने डॉक्टर असून, त्यांच्या विरोधात ठाणे कोर्टात कलम 138 अन्वये 9 केसेस प्रलंबित आहेत. कायदेशीर मदत मिळवण्यासाठी त्यांनी जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाकडे अर्ज केला होता, त्यानुसार प्राधिकरणाचे पॅनल वकिल एडवोकेट गणेश रविंद्र दरवेश यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, न्यायालयात केस व्यवस्थित चालवण्यासाठी आणि मानधन म्हणून एड. गणेश दरवेश याने तक्रारदाराकडे सुरुवातीला 4500 रुपयांची मागणी केली आणि ही रक्कम त्याच्या पत्नीच्या बँक खात्यावर जमा करण्यास सांगितली. तसेच त्याची पत्नी वर्षा गणेश दरवेश हिनेदेखील लाच देण्यास प्रोत्साहन दिले होते.

रंगेहाथ पकडले आणि गुन्हा दाखल

तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे कार्यालयात तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता, वकिल गणेश दरवेश आणि त्याची पत्नी वर्षा दरवेश यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सापळा रचून ठाण्यातील वर्टनगर परिसरात 4500 रुपयांची लाच स्वीकारताना आरोपी वकिलाला रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 (सुधारित 2018) अन्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असून, एसीबीचे अधिकारी पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा: Ranjit Shirole : राज ठाकरेंना मोठा धक्का; मनसे नेते रणजीत शिरोळे यांनी सोडली साथ, काँग्रेस पक्षात केला मोठा प्रवेश

शेयर करें