मुख्य सामग्री पर जाएँ

Thackeray News : "30 वर्षांत मराठी माणसाला घरही देऊ शकले नाही!"; ठाकरे बंधूंच्या पराभवावर फडणवीसांचे टीकास्त्र; 'दोस्त दोस्त ना रहा' गाण्याचाही उल्लेख

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी 15 वर्षांत एकही आयकॉनिक प्रकल्प दाखवावा, फडणवीसांचे खुले आव्हान | बीडीडी चाळीच्या घरांवरून ठोकला यशाचा दावा | ठाकरे बंधूंच्या युतीवर मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी

व
विवेक

2 मिनट पठन

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी 15 वर्षांत एकही आयकॉनिक प्रकल्प दाखवावा, फडणवीसांचे खुले आव्हान | बीडीडी चाळीच्या घरांवरून ठोकला यशाचा दावा | ठाकरे बंधूंच्या युतीवर मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी

मुंबई :- मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत Mumbai BMC उद्धव ठाकरे Uddhav Thackeray आणि राज ठाकरे Raj Thackeray या 'ठाकरे बंधूंनी' एकत्र येऊनही मतदारांनी त्यांना नाकारले. या निकालावर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या 30 वर्षांच्या सत्तेचा पाढाच वाचला. "मुंबईतील मराठी माणूस आता भावनिक राजकारणाला भुलणारा राहिलेला नाही, तर तो विकासाचा विचार करू लागला आहे," असे फडणवीस यांनी एका मुलाखती दरम्यान स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांच्या टीकेतील 3 मोठे मुद्दे

विकासाच्या मुद्द्यावर 100 रुपयांचे आव्हान!

फडणवीस म्हणाले की, "निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मी उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान दिले होते की, त्यांनी त्यांच्या भाषणात मुंबईच्या विकासावर किमान दोन मिनिटे बोलावे, मी त्यांना 100 रुपये देईन. नंतर मी ही रक्कम 3 हजार रुपयांपर्यंत वाढवली, तरीही ते मुंबईच्या विकासावर काहीही बोलले नाहीत. त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच नव्हते."

मराठी माणसाचे स्थलांतर आणि घरांचा प्रश्न

"गेल्या 30 वर्षांत मुंबईतील मराठी माणूस शहराबाहेर फेकला गेला. मुंबई महानगरपालिकेवर एवढा काळ सत्ता असूनही उद्धव ठाकरे मराठी माणसाला साधे एक घरही देऊ शकले नाहीत. याउलट, आम्ही बीडीडी चाळींचा पुनर्विकास करून मराठी माणसाला हक्काची घरे दिली. त्यामुळे मराठी माणसाने 'भाषण' देणाऱ्यांपेक्षा 'प्रशासन' चालवणाऱ्या आम्हाला पसंती दिली," असे फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.

"एक आयकॉनिक प्रकल्प दाखवा!"

मुंबईत गेल्या 15 वर्षांपासून उद्धव ठाकरे स्वतः लक्ष घालत आहेत, मग त्यांच्या सत्तेच्या काळात त्यांनी उभारलेला एक तरी 'आयकॉनिक' प्रकल्प दाखवावा, असे आव्हानही त्यांनी दिले. मुंबईचा विकास केवळ कागदावरच राहिल्याने लोकांनी त्यांना नाकारल्याचे फडणवीस म्हणाले.

'दोस्त दोस्त ना रहा'.. फोनच्या प्रश्नावर मिश्किल उत्तर

मुलाखती दरम्यान फडणवीस यांना एक मजेशीर प्रश्न विचारण्यात आला की, "समजा रात्री 2 वाजता उद्धव ठाकरेंचा फोन आला तर तुमची प्रतिक्रिया काय असेल?" यावर फडणवीसांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले. ते म्हणाले, "पहिली गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फोन करणार नाहीत, कारण ते लवकर झोपतात. पण समजा त्यांचा फोन येणार आहे हे मला आधीच समजले, तर मी माझ्या फोनची रिंगटोन 'दोस्त दोस्त ना रहा' ही लावून ठेवीन!" त्यांच्या या उत्तराने मुलाखतीत एकच हशा पिकला.

शेयर करें