Pune News : तीर्थ डेव्हलपर्स'ला मनपाचा ६.४३ कोटींचा दंड
महत्वाचे मुद्दे *मौजे सुस येथील 'तीर्थ अविला' या गृहप्रकल्पासाठी नियमबाह्य रीतीने १,७६० रनिंग मीटर रस्ता खोदून विद्युत केबल टाकली *खोदाईबाबत रयत स्वाभिमानी संघटनेने पथ विभागाकडे अधिकृत तक्रार केली दाखल *कोणतीही पूर्वपरवानगी न घेता अनधिकृत खोदाई केल्याने ट्रेंचिंग पॉलिसीनुसार प्रचलित दराच्या तिप्पट द
2 मिनट पठन

Pune News : पथ विभागाने कडक कारवाईचा बडगा; विजय तुकाराम रौंदळ यांना दंडात्मक नोटीस
महत्वाचे मुद्दे
*मौजे सुस येथील 'तीर्थ अविला' या गृहप्रकल्पासाठी नियमबाह्य रीतीने १,७६० रनिंग मीटर रस्ता खोदून विद्युत केबल टाकली
*खोदाईबाबत रयत स्वाभिमानी संघटनेने पथ विभागाकडे अधिकृत तक्रार केली दाखल
*कोणतीही पूर्वपरवानगी न घेता अनधिकृत खोदाई केल्याने ट्रेंचिंग पॉलिसीनुसार प्रचलित दराच्या तिप्पट दंडाची कारवाई
*खोदाईबाबत नोटीस पाठवून खुलासा देण्याचे आदेश असतानाही विकसकाने तो सादर केला नाहीhttps://maharashtramirror.com/ Pune News
खोदाई केलेली लांबी: १,७६० रनिंग मीटर
प्रचलित दर प्रति मीटर: १२,१९२ रुपये
मुळ आकारणी रक्कम: २,१४,५७,९२० रुपये
तिप्पट दंडात्मक रक्कम: ६,४३,७३,७६० रुपये https://maharashtramirror.com/ Pune News
Pune News : पुणे, धनश्री ओतारी
Pune News :पुणे महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय बेकायदेशीरपणे रस्ता खोदाई करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर महापालिकेच्या पथ विभागाने कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. मौजे सुस येथील 'तीर्थ अविला' या गृहप्रकल्पासाठी नियमबाह्य रीतीने १,७६० रनिंग मीटर (र.मी.) रस्ता खोदून विद्युत केबल टाकल्याप्रकरणी मे. तीर्थ डेव्हलपर्स विजय तुकाराम रौंदळ यांना ६ कोटी ४३ लाख ७३ हजार ७६० रुपयांची दंडात्मक नोटीस बजावण्यात आली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
महापालिकेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता अनधिकृत खोदाई केल्याने मनपाच्या ट्रेंचिंग पॉलिसीनुसार प्रचलित दराच्या तिप्पट दंडाची ही कारवाई करण्यात आली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
सुस येथील सर्वे नंबर १२७/१ आणि २ सह इतर भूखंडांवर मे. तीर्थ डेव्हलपर्सचा 'तीर्थ अविला' हा गृहप्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी वीज जोडणी मिळवण्यासाठी विकसकाने मुख्य रस्त्यावर तब्बल १,७६० रनिंग मीटर लांबीची रस्ता खोदाई करून विद्युत केबल टाकली होती.
या अनाधिकृत खोदाईबाबत 'रयत स्वाभिमानी संघटना' यांनी मनपाच्या पथ विभागाकडे अधिकृत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत पथ विभागाने विकसकाला विनापरवाना खोदाईबाबत नोटीस पाठवून खुलासा देण्याचे आदेश दिले होते, मात्र विकसकाने यावर कोणताही खुलासा सादर केला नाही.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या बाणेर विभागाकडून महापालिकेला प्राप्त झालेल्या अधिकृत पत्रानुसार (जा.क्र. AE/बाणेर/T-530), सुस येथील तीर्थ अविला प्रकल्पाच्या वीज जोडणीसाठी १,७६० रनिंग मीटर केबल टाकण्यात आल्याचे स्पष्ट झाले. या पत्रावरून विकसकाने महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता थेट रस्त्याची खोदाई केल्याची बाब निष्पन्न झाली.
पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेच्या ठराव क्र. ५० (दिनांक २०/५/२०१४) आणि ट्रेंचिंग पॉलिसी गाईडलाईन्सनुसार, मनपा हद्दीत कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावर किंवा फुटपाथवर परवानगीशिवाय खोदाई केल्यास पुनर्स्थापना दराच्या ३ पट दंड वसूल करण्याची तरतूद आहे.
त्वरीत दंड भरण्याचे आदेश
दंडाची ही रक्कम मनपाच्या कोषागारात त्वरित जमा करावी, अन्यथा विकसकावर पुढील कठोर कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असा इशारा महापालिकेने पत्राद्वारे दिला आहे. पुणे शहरात सध्या विविध ठिकाणी रस्त्यांची नासधूस करून विनापरवाना केबल टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेच्या या धडक कारवाईमुळे विनापरवाना खोदाई करणाऱ्या इतर बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहेत.
