मुख्य सामग्री पर जाएँ

Mumbai News : टीम इंडियाच्या निवड समितीत मोठे बदल;प्रज्ञान ओझांकडे अध्यक्षपदाची धुरा; मुंबईकर रमेश पोवार यांना सीनियर निवड समितीत संधी

Mumbai News :मुंबई: भारतीय क्रिकेट संघाच्या राष्ट्रीय निवड समितीत बीसीसीआयने महत्त्वाचे बदल केले आहेत.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

प्रज्ञान ओझांकडे अध्यक्षपदाची धुरा; मुंबईकर रमेश पोवार यांना सीनियर निवड समितीत संधी
प्रज्ञान ओझांकडे अध्यक्षपदाची धुरा; मुंबईकर रमेश पोवार यांना सीनियर निवड समितीत संधी

Mumbai News :मुंबई: भारतीय क्रिकेट संघाच्या राष्ट्रीय निवड समितीत बीसीसीआयने महत्त्वाचे बदल केले आहेत. अजित आगरकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर समितीतील ज्येष्ठ सदस्य प्रज्ञान ओझा यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याचवेळी मुंबईचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक रमेश पोवार यांची सीनियर निवड समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली.https://maharashtramirror.com/ Mumbai news

अजित आगरकर यांनी जुलै २०२३ पासून राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी प्रज्ञान ओझा यांना बढती देण्यात आली. ओझा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीत शिव सुंदर दास, आर. पी. सिंग, अजय रात्रा आणि रमेश पोवार यांचा समावेश असेल.

पोवार यांच्या नावावर एकमत

बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीने निवड समितीतील सदस्य निवडीची प्रक्रिया पार पाडली. अशोक मल्होत्रा आणि जतीन परांजपे यांचा समावेश असलेल्या या समितीने रमेश पोवार यांच्या नावाची एकमताने शिफारस केली.

मुंबईचे माजी क्रिकेटपटू असलेल्या पोवार यांनी भारतासाठी दोन कसोटी आणि ३१ एकदिवसीय सामने खेळले आहेत. खेळाडू म्हणून कारकीर्द संपल्यानंतर त्यांनी प्रशिक्षक म्हणूनही विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम केले आहे. तसेच मुंबई आणि गुजरात संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली आहे. बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये गोलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

प्रज्ञान ओझांकडे अध्यक्षपद

अजित आगरकर यांच्या जागी आता प्रज्ञान ओझा राष्ट्रीय निवड समितीचे नेतृत्व करणार आहेत. आगरकर यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारतीय संघाने आयसीसीच्या तीन स्पर्धांसह दोन आशिया कप जिंकल्याचे तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्णपदके मिळवल्याचे बीसीसीआयने नमूद केले आहे.

टीम इंडियाची नवी निवड समिती

अध्यक्ष : प्रज्ञान ओझा सदस्य : शिव सुंदर दास, आर. पी. सिंग, अजय रात्रा आणि रमेश पोवार

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेयर करें