मुख्य सामग्री पर जाएँ

Team India : वानखेडेवर हाय-व्होल्टेज ड्रामा! नाणेफेक जिंकून इंग्लंडची फिल्डिंग; 'मिशन फायनल'साठी टीम इंडिया प्रथम फलंदाजीला

Eng won the toss : मुंबईत भारतीय संघाचे स्वप्न साकार होणार!

व
विवेक

1 मिनट पठन

Team India : वानखेडेवर हाय-व्होल्टेज ड्रामा! नाणेफेक जिंकून इंग्लंडची फिल्डिंग; 'मिशन फायनल'साठी टीम इंडिया प्रथम फलंदाजीला

Eng won the toss : मुंबईत भारतीय संघाचे स्वप्न साकार होणार! मुंबई सेमी फायनल मध्ये भारतीय संघ फायनल मध्ये धडक मारणार का?

IND vs ENG semi final T20 World Cup 2026 ,मुंबई :- टी-20 विश्वचषक 2026 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीचा बिगुल वाजला आहे. मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर आज भारत आणि इंग्लंड हे दोन दिग्गज संघ आमनेसामने आहेत. अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक याने नाणेफेक (Toss) जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भारतीय संघ आता घरच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करून इंग्लंडसमोर धावांचा डोंगर उभा करण्यासाठी सज्ज झाला आहे.

टीम इंडियामध्ये 'नो चेंज'; विजयी कॉम्बिनेशनवर विश्वास

भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने आजच्या निर्णायक सामन्यासाठी संघात कोणताही बदल केलेला नाही. गेल्या काही सामन्यांत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवरच पुन्हा एकदा विश्वास दाखवण्यात आला आहे. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन ही सलामीची जोडी भारताला आक्रमक सुरुवात करून देण्यासाठी सज्ज आहे, तर मधल्या फळीत सूर्या, इशान आणि हार्दिक पांड्या यांच्यावर मोठी जबाबदारी असेल.

इंग्लंडच्या संघात एक मोठा बदल

दुसरीकडे, इंग्लंडने आपल्या संघात एक धोरणात्मक बदल केला आहे. फिरकीपटू रेहान अहमदच्या जागी वेगवान गोलंदाज जेमी ओव्हरटन याला संघात स्थान देण्यात आले आहे. वानखेडेच्या खेळपट्टीवर सुरुवातीला मिळणारी उसळी लक्षात घेता इंग्लंडने हा निर्णय घेतल्याचे समजते. जोफ्रा आर्चर आणि सॅम करन यांच्यासोबत ओव्हरटनची साथ इंग्लंडच्या वेगवान आक्रमणाला अधिक धार देईल.

दोन्ही संघांची 'प्लेईंग इलेव्हन' खालीलप्रमाणे

भारतीय संघ

अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.

इंग्लंड संघ

फिलिप सॉल्ट, जोस बटलर (यष्टीरक्षक), हॅरी ब्रूक (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, जेमी ओव्हरटन, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद.

शेयर करें