मुख्य सामग्री पर जाएँ

Pune News : तरंगवाडीत बंद घर फोडून चोरी; सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईलसह ३ लाख १६ हजारांचा ऐवज लंपास

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी येथे बंद घराच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

तरंगवाडीत बंद घर फोडून चोरी; सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईलसह ३ लाख १६ हजारांचा ऐवज लंपास
तरंगवाडीत बंद घर फोडून चोरी; सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईलसह ३ लाख १६ हजारांचा ऐवज लंपास

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी येथे बंद घराच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला. बेडरूममधील कपाटातून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण ३ लाख १६ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना १ नोव्हेंबरच्या रात्री ते २ नोव्हेंबरच्या पहाटेच्या दरम्यान घडल्याची नोंद आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
याप्रकरणी मारुती गोपाळ बुनगे (वय ७०, रा. तरंगवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याने घराच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाटातील कप्प्यात ठेवलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल चोरून नेला.https://maharashtramirror.com/ Pune News

चोरीला गेलेल्या ऐवजात सोन्याचा राणीहार, सोन्याची चेन, सोन्याचे दागिने, सात ग्रॅम वजनाची सोन्याची नथ, ११ हजार ५०० रुपये रोख आणि मुलगा अक्षय याचा १० हजार रुपये किमतीचा मोबाईल यांचा समावेश आहे. चोरी गेलेल्या मालाची एकूण किंमत ३ लाख १६ हजार ५०० रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शिंदे करीत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेयर करें