मुख्य सामग्री पर जाएँ

Pune News : हिंदू धर्माविषयीच्या गैरसमजांविरोधात आवाज उठवणे आवश्यक - स्वाती गोयल शर्मा यांचे प्रतिपादन

Pune News : पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात हिंदू धर्माविषयी चित्रपटांच्या माध्यमातून अनेक चुकीचे समज पसरवले जात असल्याचा आरोप करत, या प्रवृत्तीविरोधात समाजाने आवाज उठवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शोध पत्रकार स्वाती गोयल शर्मा यांनी केले.

वक
विक्रांत कुलकर्णी

2 मिनट पठन

हिंदू धर्माविषयीच्या गैरसमजांविरोधात आवाज उठवणे आवश्यक - स्वाती गोयल शर्मा यांचे प्रतिपादन
हिंदू धर्माविषयीच्या गैरसमजांविरोधात आवाज उठवणे आवश्यक - स्वाती गोयल शर्मा यांचे प्रतिपादन

Pune News : अरुंधती फाउंडेशनतर्फे सामूहिक तर्पणातून पूर्वज व हुतात्म्यांना अभिवादन

Pune News : पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात हिंदू धर्माविषयी चित्रपटांच्या माध्यमातून अनेक चुकीचे समज पसरवले जात असल्याचा आरोप करत, या प्रवृत्तीविरोधात समाजाने आवाज उठवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शोध पत्रकार स्वाती गोयल शर्मा यांनी केले. हिंदू धर्माविषयी होत असलेल्या आक्षेपार्ह चित्रणाबाबत समाजाने जागरूक राहिले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.https://maharashtramirror.com/ Pune News

अरुंधती फाउंडेशन आणि देव देवेश्वर संस्थान यांच्या वतीने सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या सभागृहात सामूहिक तर्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शंखनाद, ओंकार स्तवन आणि पवित्र मंत्रोच्चारांच्या धार्मिक वातावरणात धर्म व मातृभूमीसाठी बलिदान दिलेल्या पूर्वजांना आणि हुतात्म्यांना तर्पणाच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आले.

या वेळी ज्येष्ठ विधिज्ञ सदानंद फडके, देव देवेश्वर संस्थानचे रमेश भागवत, अरुंधती फाउंडेशनचे हिमांशू गुप्ते, आदित्य गुप्ते, धर्मशास्त्र संशोधक आर्या जोशी आणि विद्याधर नारगोळकर उपस्थित होते.

स्वाती गोयल शर्मा म्हणाल्या, हिंदी चित्रपटांच्या माध्यमातून हिंदू धर्माविषयी चुकीच्या धारणा निर्माण केल्या जात असल्याचे दिसून येते. चित्रपटांमधील धार्मिक विषयांचे चित्रण आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. सेन्सॉर बोर्डाची भूमिका आणि चित्रपटांना दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रांच्या परिणामकारकतेबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. ओटीटी माध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे चित्रपटांच्या आशयावर नियंत्रण ठेवण्याच्या विद्यमान व्यवस्थेच्या मर्यादा स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले.

सामूहिक तर्पणातून धर्मवीरांचे स्मरण

अरुंधती फाउंडेशनचे हिमांशू गुप्ते यांनी कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “हरिद्वार येथे घाटावर सामूहिक तर्पण होताना पाहिल्यानंतर पुण्यातही अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्याची कल्पना सुचली. पुण्याच्या भूमीला शिवकालापासून अनेक धर्मवीरांच्या बलिदानाचा इतिहास लाभला आहे. या वीरांचे सामूहिक स्मरण व्हावे आणि नव्या पिढीला त्यांच्या इतिहासाची व परंपरेची माहिती मिळावी, या उद्देशाने कार्यक्रम आयोजित केला आहे.”

पितृपंधरवड्याबाबतचे गैरसमज दूर करा

ज्येष्ठ विधिज्ञ सदानंद फडके म्हणाले, पितृपंधरवडा अशुभ असतो, ही समजूत चुकीची आहे. हिंदू संस्कृतीत पूर्वजांचे स्मरण आणि त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कालावधी महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे पितृपंधरवड्याबाबत मनात असलेले गैरसमज दूर करून या परंपरेकडे योग्य दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात स्वाती गोयल शर्मा यांचा ‘जेम्स ऑफ बॉलीवूड’ हा दृक्-श्राव्य कार्यक्रम सादर करण्यात आला. तसेच अरुंधती फाउंडेशनच्या वतीने स्वाती गोयल शर्मा यांच्या संस्थेला आर्थिक मदत करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरजे बंड्या यांनी केले.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेयर करें