Mumbai News : साखर खरेदीवर मर्यादा
Mumbai News : मुंबई : गणेशोत्सव आणि सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच सामान्य नागरिकांच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
1 मिनट पठन

Mumbai News : मुंबई : गणेशोत्सव आणि सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच सामान्य नागरिकांच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशात साखरेचा पुरवठा कमी झाल्यामुळे आणि किरकोळ किमतींमध्ये अचानक प्रचंड वाढ झाल्याने ऑनलाइन क्विक-कॉमर्स ॲप्ससह मोठ्या सुपरमार्केट्सनी साखर खरेदीवर मर्यादा घातली आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai News
कोणत्या ॲप आणि स्टोअरवर किती मर्यादा?
साठेबाजी रोखण्यासाठी आणि सर्व ग्राहकांना साखर उपलब्ध व्हावी यासाठी विविध प्लॅटफॉर्म्सनी खालीलप्रमाणे मर्यादा निश्चित केली आहे-
• ब्लिंकिट: एका वेळी जास्तीत जास्त ५ किलो.
• स्विगी इन्स्टामार्ट: १-१ किलोचे २ पॅक किंवा ५ किलोचा १ पॅक.
• बिगबास्केट: जास्तीत जास्त ६ किलो (वेगवेगळ्या ब्रँड्सचे).
• डीमार्ट आणि रिलायन्स रिटेल: प्रत्येक ग्राहकासाठी जास्तीत जास्त २ ते ३ किलो.
