Pune News : विद्यार्थ्यांसाठी पहिल्या आंतरराष्ट्रीय स्टुडंट फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाचे आयोजन
Pune News पुणे : फिल्म स्कूल्समधील उद्योन्मुख चित्रपट निर्मात्यांसाठी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म स्कूल तर्फे फक्त विद्यार्थ्यांनसाठी पहिल्या स्टुडंट फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाचे आयोजन करण्यात आले आहे.
1 मिनट पठन

Pune News : १० सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर पर्यंत फिल्म सादरीकरणाचे आवाहन
Pune News पुणे : फिल्म स्कूल्समधील उद्योन्मुख चित्रपट निर्मात्यांसाठी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म स्कूल तर्फे फक्त विद्यार्थ्यांनसाठी पहिल्या स्टुडंट फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव कोथरुड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या कॅम्पसमध्ये होईल. ज्या विद्यार्थ्यांना यात सहभाग घ्यावयाचा आहे त्यांनी ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी पूर्वी आपला चित्रपट सादर करावा. असे आवाहन चित्रपट महोत्सव समितीचे अध्यक्ष, प्रसिद्ध चित्रपट निर्माते व दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म स्कूलचे क्रिएटिव्ह डायरेक्टर अभिजित पानसे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. याप्रसंगी स्टुफीच्या (STUFFI) अधिकृत वेबसाईट चे अनावरण मान्यवरांच्या करण्यात आले.https://maharashtramirror.com/ Pune News
यावेळी महोत्सावाचे संचालक व ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक, शिक्षणतज्ज्ञ आणि नामांकित चित्रपट समीक्षक अशोक राणे, दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म स्कूलचे प्रोग्रॅम डायरेक्टर डॉ.अरूण प्रकाश, दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म स्कूलच्या डायरेक्टर डॉ.स्नेहा समद्दर आणि फिल्म फेस्टिवलचे प्रोग्रॅम हेड मंगेश मर्ढेकर उपस्थित होते.https://maharashtramirror.com/ Pune news
अभिजित पानसे यांनी सांगितले की, सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी गोल्डन ट्रॉफी, प्रमाणपत्र, सुवर्ण पदक आणि १ लाख रुपये रोख देण्यात येणार आहे. त्याच बरोबर विविध विभागात पुरस्कार देण्यात येणार आहे. महोत्सावात चित्रपट सादरीकरणासाठी कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. यात सहभागी होण्यासाठी चित्रपटाची निर्मिती १ नोव्हेंबर २०२४ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालाधातील असावी. ३१ जानेवारी २०२७ रोजी चित्रपट दिग्दर्शकाचे वय १८ ते ३० वर्षाच्या दरम्यान असावे. चित्रपट सादर करण्यास १० सप्टेंबर रोजी सुरूवात होईल. निवडीसाठी अर्जदाराला चित्रपटाची ऑनलाइन प्रिव्ह्यू लिंक सादर करावी लागेल. सर्व चित्रपटांचा कालावधी जास्तीत जास्त २० मिनिटांची असावा.
