Pune News : नशामुक्त एसटी अभियान; चालकांची कर्तव्यापूर्वी मद्य चाचणी
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत एसटी चालकांच्या मद्य आणि अमली पदार्थ सेवनाला आळा घालण्यासाठी राज्यात ‘नशामुक्त एसटी महामंडळ अभियान’ राबविण्यात येणार आहे.
1 मिनट पठन

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत एसटी चालकांच्या मद्य आणि अमली पदार्थ सेवनाला आळा घालण्यासाठी राज्यात ‘नशामुक्त एसटी महामंडळ अभियान’ राबविण्यात येणार आहे. ‘नशामुक्त चालक, सुरक्षित प्रवास, सक्षम महाराष्ट्र’ या संकल्पनेअंतर्गत चालकांची कर्तव्यावर येण्यापूर्वी मद्य चाचणी तसेच अचानक अमली पदार्थ सेवनाची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी एकात्मिक तपासणी व्यवस्था उभारण्याची कार्यवाही केली जाणार आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
चालक कोणत्याही प्रकारच्या नशेच्या प्रभावाखाली वाहन चालवू नये आणि प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. एसटी महामंडळाच्या चालकांसह सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्थेतील चालकांची नशामुक्ती तपासणी अधिक प्रभावी करण्यावर भर दिला जाणार आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
कर्तव्यापूर्वी मद्य चाचणी
चालक कर्तव्यावर येण्यापूर्वी मद्यसेवन केले आहे का, याची तपासणी केली जाणार आहे. यासोबतच अचानक अमली पदार्थ सेवनाची तपासणीही केली जाईल. महापालिका बससेवा, शासकीय वाहने, सार्वजनिक उपक्रम तसेच शासनासाठी कार्यरत कंत्राटी वाहनांच्या चालकांचाही या तपासणी व्यवस्थेत समावेश केला जाणार आहे.
खासगी प्रवासी वाहतूकही रडारवर
खासगी बस, पर्यटन वाहने, टॅक्सी, कॅब, ऑटोरिक्षा आणि कंत्राटी प्रवासी वाहतूक सेवांमधील चालकांसाठीही नशामुक्ती तपासणी व्यवस्था लागू केली जाणार आहे. अमली पदार्थ सेवनाची प्राथमिक तपासणी करण्यासाठी विशेष ड्रग डिटेक्शन किटचा वापर करण्यात येणार आहे. सार्वजनिक आणि खासगी प्रवासी वाहतूक क्षेत्रातील चालकांची नियमित तसेच अचानक तपासणी केल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेला अधिक प्राधान्य मिळणार आहे.
अपघातानंतरही चालकाची तपासणी
एसटी चालकांकडून सुरक्षित वाहनचालकतेला प्राधान्य दिले जाते. एखादा किरकोळ अपघात झाला तरी संबंधित चालकाला समज देऊन आवश्यक ती कार्यवाही केली जाते. तसेच चालक बस चालविण्यासाठी ड्युटीवर येण्यापूर्वी त्याची अल्कोहोल टेस्ट घेतली जाते.
“प्रवाशांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. चालक ड्युटीवर येण्यापूर्वी त्याची अल्कोहोल टेस्ट घेतली जाते. अपघाताची घटना घडल्यास त्याची गांभीर्याने दखल घेतली जाते. आता अमली पदार्थ सेवनाची अचानक तपासणीही प्रभावीपणे राबविण्यात येणार असून, चालक नशामुक्त असणे आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवास मिळणे याला सर्वोच्च प्राधान्य असेल.”
— अरुण सिया, विभागीय नियंत्रक, पुणे
