मुख्य सामग्री पर जाएँ

Pune News : एनसीएमसी कार्डमुळे प्रवासी-कंडक्टरमध्ये वाद ; तांत्रिक अडचणींमुळे प्रवाशांचा मनस्ताप

Pune News पुणे , महाराष्ट्र मिरर : सार्वजनिक वाहतुकीत एनसीएमसी (NCMC) कार्डचा वापर वाढविण्याचा प्रयत्न सुरू असतानाच कार्डच्या वापरादरम्यान प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

एनसीएमसी कार्डमुळे प्रवासी-कंडक्टरमध्ये वाद तांत्रिक अडचणींमुळे प्रवाशांचा मनस्ताप
एनसीएमसी कार्डमुळे प्रवासी-कंडक्टरमध्ये वाद तांत्रिक अडचणींमुळे प्रवाशांचा मनस्ताप

Pune News पुणे , महाराष्ट्र मिरर : सार्वजनिक वाहतुकीत एनसीएमसी (NCMC) कार्डचा वापर वाढविण्याचा प्रयत्न सुरू असतानाच कार्डच्या वापरादरम्यान प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कार्ड स्वीकारण्यास किंवा पेमेंट प्रक्रियेत अडथळे येत असल्याने काही ठिकाणी प्रवासी आणि कंडक्टर यांच्यात वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News
कार्डमध्ये पुरेशी रक्कम असूनही व्यवहार न होणे, कार्ड मशीनमध्ये कार्ड रीड न होणे, नेटवर्क अथवा तांत्रिक समस्या निर्माण होणे, तसेच व्यवहार झाला की नाही याबाबत संभ्रम निर्माण होणे, अशा तक्रारी प्रवाशांकडून करण्यात येत आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News
या समस्यांमुळे बसमध्ये प्रवाशांचा वेळ वाया जात असून, कंडक्टरनाही प्रवाशांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः गर्दीच्या वेळेत अशा प्रकारच्या तांत्रिक अडचणींमुळे बसमधील वातावरण तापण्याचे प्रकार घडत आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News
एनसीएमसी कार्डचा वापर अधिक सुलभ आणि प्रभावी करण्यासाठी तांत्रिक अडचणी तातडीने दूर करणे, कार्ड रिचार्ज व व्यवहाराची स्पष्ट माहिती उपलब्ध करून देणे आणि कंडक्टर तसेच प्रवाशांना योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. अन्यथा डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशालाच धक्का बसण्याची शक्यता आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
मी एसटीने नेहमीच प्रवास करते. प्रवासादरम्यान तिकीट काढण्यासाठी सोय व्हावी म्हणून मी एनसीएमसी कार्ड काढले आहे. मात्र, एसटी बसमध्ये तिकीट काढताना कार्ड स्वाइप केले असता ते स्वीकारले गेले नाही. कार्डमध्ये पुरेशी रक्कम असूनही व्यवहार पूर्ण झाला नाही. त्यामुळे मला पुन्हा तिकीट काढण्यासाठी रोख रक्कम किंवा दुसऱ्या पर्यायाचा वापर करावा लागला.
एनसीएमसी कार्डमुळे प्रवास अधिक सुलभ आणि वेळेची बचत होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात कार्ड काम न केल्याने मला मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. एसटी बसमध्ये एनसीएमसी कार्डची सुविधा सुरळीतपणे उपलब्ध करून देऊन, कार्ड स्वाइपची समस्या तातडीने दूर करावी, ही विनंती. वर्षा भोंगळे, महिला एसटी प्रवासी

शेयर करें