मुख्य सामग्री पर जाएँ

Special Train News : आषाढीला भाविकांसाठी पंढरीला धावणार विशेष रेल्वे

पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने दादर–पंढरपूर दरम्यान दोन विशेष रेल्वे फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

वज
विदुला जगदाळे

1 मिनट पठन

Special Train News : आषाढीला भाविकांसाठी पंढरीला धावणार विशेष रेल्वे

पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने दादर–पंढरपूर दरम्यान दोन विशेष रेल्वे फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्या २४ आणि २६ जुलै रोजी धावणार असून, पुणे मार्गे प्रवास करणाऱ्या वारकरी आणि प्रवाशांना याचा मोठा लाभ होणार आहे.Special Train News

दादर–पंढरपूर विशेष रेल्वे; पुणे मार्गे दोन फेऱ्या

मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०१०४५ ही विशेष गाडी २४ जुलै रोजी दुपारी १२.५० वाजता दादर येथून सुटून रात्री ९.१५ वाजता पंढरपूरला पोहोचेल. तर परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०१०४६ ही विशेष गाडी २६ जुलै रोजी रात्री १२.१५ वाजता पंढरपूरहून सुटून त्याच दिवशी सकाळी ११.४५ वाजता दादरला पोहोचणार आहे.

पुणे विभागातील वारकरी आणि भाविकांना पंढरपूरला जाण्यासाठी या अतिरिक्त रेल्वे सुविधा उपलब्ध होणार आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी या विशेष गाडीत दोन वातानुकूलित तृतीय श्रेणी (3AC), दहा शयनयान (Sleeper), चार सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन द्वितीय आसन डबे तसेच गार्ड ब्रेक व्हॅन अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

या विशेष गाड्यांना ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड आणि कुर्डुवाडी या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

आवश्यकतेनुसार अतिरिक्त गाड्या सोडणार

या विशेष गाड्यांसाठीचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू झाले आहे. यात्रेदरम्यान प्रवाशांची गर्दी आणखी वाढल्यास आवश्यकतेनुसार अतिरिक्त विशेष गाड्या चालविण्यात येतील, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

शेयर करें