मुख्य सामग्री पर जाएँ

Sonia Gandhi : सोनिया गांधी रुग्णालयात दाखल; श्वास घेण्यास त्रास झाल्याने उपचार सुरू, राहुल गांधींचा केरळ दौरा रद्द

• दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात सोनियाजींवर उपचार; प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती

व
विवेक

1 मिनट पठन

Rajasthan Congress Manifesto 2024 : 'आज संविधान बदलण्याचे षड्यंत्र', जयपूरमधून सोनिया गांधींचा मोदी सरकारवर मोठा हल्लाबोल

•दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात सोनियाजींवर उपचार; प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती

ANI :- काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि खासदार सोनिया गांधी यांची प्रकृती मंगळवारी रात्री अचानक बिघडल्याने त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून, सध्या तज्ज्ञ डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

रात्री 1 च्या सुमारास अचानक अस्वस्थता

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री 1 वाजेच्या सुमारास सोनिया गांधी यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाला. त्यानंतर विलंब न लावता त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. वरिष्ठ डॉक्टर डॉ. अनुप बसू यांच्या देखरेखीखाली सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून, वैद्यकीय पथकाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

राहुल गांधींचा केरळ दौरा रद्द

सोनिया गांधींच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपला नियोजित केरळ दौरा तडकाफडकी रद्द केला आहे. केरळ विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आज ते कोझिकोड येथे एका मोठ्या सभेला संबोधित करणार होते. मात्र, आईच्या प्रकृतीमुळे त्यांनी दिल्लीतच राहण्याचा निर्णय घेतला आहे.

मल्लिकार्जुन खर्गे भूषवणार कोझिकोडची सभा

राहुल गांधी उपस्थित राहू शकणार नसल्याने, आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे कोझिकोड येथील सभेला संबोधित करतील. निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचाराचा वेग कायम ठेवण्यासाठी पक्षनेतृत्वाने हा बदल केला आहे.

प्रियंका गांधी रुग्णालयात आहे

सोनिया गांधींना रुग्णालयात दाखल केल्याचे समजताच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी तातडीने सर गंगाराम रुग्णालयात पोहोचले. प्रियंका गांधी सध्या रुग्णालयातच उपस्थित असून, त्या डॉक्टरांकडून वेळोवेळी प्रकृतीचा आढावा घेत आहेत. काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधींच्या दीर्घायुष्यासाठी आणि लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.

हेही वाचा: Thane News : येऊरच्या जंगलात माकडांवर धनुष्य-बाणाने जीवघेणे हल्ले; वनविभागाकडून आरोपीची माहिती देणाऱ्यास 25 हजारांचे बक्षीस जाहीर

शेयर करें