मुख्य सामग्री पर जाएँ

Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांचे २६ दिवसांनंतर उपोषण समाप्त; केंद्र सरकारकडून मागण्या मान्य

नवी दिल्ली, महाराष्ट्र मिरर

धओ
धनश्री ओटारी

2 मिनट पठन

Sonam Wangchuk
Sonam Wangchuk

Sonam Wangchuk : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर बोलताना वांगचुक यांनी स्पष्ट केले की......

नवी दिल्ली, महाराष्ट्र मिरर

Sonam Wangchuk : गेल्या २८ जूनपासून नीट परीक्षा अनियमितता आणि पेपरफुटी प्रकरणाविरोधात दिल्लीतील जंतर-मंतर येथे बेमुदत उपोषणाला बसलेले प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी अखेर आपले २६ दिवसांचे उपोषण मागे घेतले आहे. शुक्रवारी केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी उपोषण सोडल्याची माहिती दिली. आंदोलकांवर कोणतेही गुन्हे दाखल न करणे आणि पेपरफुटी प्रकरणातील पीडित कुटुंबांना भरपाई देण्याबाबत सरकारने सकारात्मक आश्वसन दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. Sonam Wangchuk End Of Hunger Jantar Mantar Protest

प्रकृती अस्वास्थ्यामुळे गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल असलेल्या सोनम वांगचुक यांच्याशी चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी भेट घेतली. लडाखच्या 'ॲपेक्स बॉडी'च्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत मंत्र्यांनी सरकारतर्फे अधिकृत आश्वासने वांगचुक यांच्यासमोर वाचून दाखवली. त्यानंतर वांगचुक यांनी ज्यूस घेऊन आपले उपोषण सोडले. Sonam Wangchuk

PMC : ‘भूमी ग्रीन’वर पुन्हा सत्तेचा वरदहस्त; ६ कोटी ८३ लाखांच्या विवादास्पद प्रस्तावाला बहुमताची मंजुरी!

या आंदोलनाबाबत बोलताना वांगचुक म्हणाले, "विविध राजकीय पक्षांच्या सुमारे ६५ खासदारांनी पत्र लिहून व स्वाक्षऱ्या करून मला उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. तसेच संसदेत नीट पेपरफुटी आणि परीक्षा पद्धतीतील सुधारणांवर चर्चा केली जाईल, असा शब्द सरकारकडून देण्यात आला आहे."

सरकारने मान्य केल्या तीन मागण्या
दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण निदर्शने करणाऱ्या आंदोलकांवर तसेच २० जुलै रोजी झालेल्या मार्चमधील सहभागाबद्दल कोणतीही दंडात्मक किंवा कायदेशीर कारवाई केली जाणार नाही. Sonam Wangchuk

संसदेच्या आगामी अधिवेशनात परीक्षा पद्धतीतील सुधारणा आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा घडवून आणली जाईल.

अलीकडील नीट परीक्षा विवादानंतर आत्महत्या केलेल्या दुर्दैवी विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना योग्य ती आर्थिक भरपाई देण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करत आहे.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर स्पष्टच भूमिका

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर बोलताना वांगचुक यांनी स्पष्ट केले की, "त्यांच्या राजीनाम्याबाबत सध्या सरकारने कोणताही तात्काळ शब्द दिलेला नाही. परंतु, संसदेच्या सभागृहात या मुद्द्यावर सखोल चर्चा नक्कीच होईल."

PMRDA : बनावट पीएमआरडीए कागदपत्रांच्या आधारे २२ खरेदीखतांची नोंद; २१ जणांविरुद्ध आंबेगाव पोलिसांत गुन्हा दाखल

ते पुढे म्हणाले, "जर त्यांनी राजीनामा दिला नाही, तर त्याने आपले किंवा विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, उलट सरकारचेच नुकसान होत आहे. मात्र, माझ्यासाठी सध्या मुलांवर कोणतेही खोटे गुन्हे दाखल होऊ नयेत आणि त्यांचे भविष्य सुरक्षित राहावे, हा मुद्दा अधिक महत्त्वाचा होता." Sonam Wangchuk

आंदोलन सुरुच राहणार

सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडले असले तरी, 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) तर्फे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान वाटेत जोपर्यंत राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत जंतर-मंतरवरील शांततापूर्ण आंदोलन असेच सुरू राहील, असा इशारा CJP नेते अभिजीत दिपके यांनी आपल्या ट्विटर (एक्स) अकाऊंटद्वारे दिला आहे. तसेच, सोनम वांगचुक यांच्या धैर्याबद्दल आणि त्यागाबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.

दरम्यान, देशभरात वाढत्या रोषाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपरफुटीविरोधात आणखी कठोर कायदे आणि कारवाई लवकरच अंमलात आणली जाईल, असे संकेत दिले आहेत. Sonam Wangchuk

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

शेयर करें