मुख्य सामग्री पर जाएँ

Baramati News : बारामतीतील सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनलचे खाते उघडले; संग्राम सोरटे बहुमताने विजयी!

Baramati News : बारामती :- बारामतीमधील अत्यंत प्रतिष्ठित आणि संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे निकाल आता हाती येऊ लागले आहेत.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

बारामतीतील सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनलचे खाते उघडले; संग्राम सोरटे बहुमताने विजयी!
बारामतीतील सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनलचे खाते उघडले; संग्राम सोरटे बहुमताने विजयी!

Baramati News : पार्थ पवारांच्या प्रचाराला यश; 24 पैकी पहिल्या निकालात जगतापांच्या बंडाला जोरदार धक्का

Baramati News : बारामती :- बारामतीमधील अत्यंत प्रतिष्ठित आणि संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे निकाल आता हाती येऊ लागले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पॅनलने आपले खाते उघडले असून, त्यांच्या पॅनलचे उमेदवार संग्राम सोरटे हे 'ब' वर्ग गटातून दणदणीत विजय मिळवून विजयी झाले आहेत. विरोधी गटाला मागे टाकत संग्राम सोरटे यांना 131 पैकी तब्बल 92 मते मिळाली आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील ही पहिलीच मोठी राजकीय निवडणूक असल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि गोटात आनंदाचे व जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे.https://maharashtramirror.com/ Baramati News

पार्थ पवारांचा निर्धार ठरला खरा; तिरंगी लढतीत चुरस वाढला

सोमेश्वर कारखान्याच्या 21 संचालक पदांच्या जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत महायुती आणि स्थानिक पातळीवर मोठी चुरस पाहायला मिळाली. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान खा. पार्थ पवार यांनी कारखान्याच्या सर्वच्या सर्व 21 जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला होता आणि त्यासाठी त्यांनी विविध मतदान केंद्रांवर जाऊन कार्यकर्त्यांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेत ताकद लावली होती. दरम्यान, या कारखान्यावर आत्तापर्यंत चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांचे निर्विवाद वर्चस्व मानले जात होते. मात्र त्यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी करत संजय जगताप यांच्या सोबतीने 'लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनल' मैदानात उतरवले होते. पहिल्याच निकालाने या बंडई गटाला मोठा धक्का दिला असून, दुपारनंतर संपूर्ण 21 जागांचे चित्र स्पष्ट होणार असल्याने सर्वांचे लक्ष अंतिम निकालाकडे लागले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेयर करें