मुख्य सामग्री पर जाएँ

Social News हडपसरमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांच्या तत्परतेने वाचला जीव

पुणे, महाराष्ट्र मिरर Social News : रिक्षाने दिलेल्या जोरदार धडकेत दहा वर्षीय चिमुकला गंभीर जखमी झाल्याची घटना हडपसरमध्ये घडली.

वज
विदुला जगदाळे

1 मिनट पठन

Social News हडपसरमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांच्या तत्परतेने वाचला जीव

जीवावर बेतलेल्या संकटातून चिमुकला सुखरूप

पुणे, महाराष्ट्र मिरर Social News : रिक्षाने दिलेल्या जोरदार धडकेत दहा वर्षीय चिमुकला गंभीर जखमी झाल्याची घटना हडपसरमध्ये घडली. या चिमुकल्याला तत्काळ मदत मिळाल्याने त्याच्यावर वेळेत वैद्यकीय उपचार होउ शकले. सामाजिक कार्यकर्ते डॉ. बच्चुसिंग टाक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे जीवावर बेतलेल्या संकटातून चिमूकला सुखरूपणे बाहेर आला. त्यांच्या या कार्याचे सर्वस्तरातून कौतुक होत असून, अजूनही माणूसकी जिवंत असल्याचा प्रत्यय यातून दिसून आला.

हडपसर क्षेत्रीय कार्यालयाशेजारील रस्त्यावर मंगळवारी (दि.१४) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एका दहा वर्षीय चिमुकल्याला रिक्षाची जोरादार धडक बसली. या अपघातामध्ये तो गंभीर जखमी झाला. या अपघाताची माहिती परिसरातील नागरिकांनी डॉ. बच्चुसिंग टाक यांना दूरध्वनीद्वारे दिली.
माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता डॉ. टाक यांनी सहकारी दिलीप डोंगरे यांच्यासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामध्ये चिमुकल्याच्या पायाचे हाड मोडल्याबरोबरच तो गंभीर जखमी झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर जखमी मुलाला सुरक्षितपणे हडपसर पोलीस ठाण्यात नेऊन घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. तसेच त्यांचे सहकारी विजय सोनवणे यांनी रूग्णवाहिकेसह घटनास्थळी पोहोचताच मुलाला तातडीने ससून सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्याच्यावर तत्काळ उपचार सुरू करण्यात आले. या संपूर्ण कार्यात डॉ. टाक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलिस प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य केले. त्यांच्या या कार्यामुळे चिमुकल्याला वेळेत वैद्यकीय उपचार मिळाले. त्यामुळे डॉ. टाक आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

कोट
“आम्ही हे कार्य पूर्णपणे निस्वार्थ समाजसेवेच्या भावनेतून करत असून, या सेवेसाठी कोणाकडूनही कोणतेही मानधन स्वीकारत नाही.”

डॉ. बच्चुसिंग टाक, सामाजिक कार्यकर्ते

शेयर करें