Pune News : साबण-शॅम्पूवरही आता हिरवा, लाल ठिपका
Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगवर शाकाहारी आणि मांसाहारी घटकांची ओळख पटविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रंगीत चिन्हांप्रमाणेच आता साबण, शॅम्पू, टूथपेस्ट, कॉस्मेटिक्स आणि टॉयलेटरीजवरही हिरवा, लाल किंवा तपकिरी ठिपका दर्शविणे बंधनकारक करण्यात आले आहे.
2 मिनट पठन

Pune News : ग्राहकांना उत्पादन शाकाहारी की प्राणीजन्य घटकांचे, हे समजणार सहज
स्मिता कुलकर्णी
Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगवर शाकाहारी आणि मांसाहारी घटकांची ओळख पटविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रंगीत चिन्हांप्रमाणेच आता साबण, शॅम्पू, टूथपेस्ट, कॉस्मेटिक्स आणि टॉयलेटरीजवरही हिरवा, लाल किंवा तपकिरी ठिपका दर्शविणे बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने Legal Metrology (Packaged Commodities) Fourth Amendment Rules, 2026 अधिसूचित केले आहेत. ही अधिसूचना 21 सप्टेंबर 2026 रोजी G.S.R. 826(E) या क्रमांकाने प्रसिद्ध करण्यात आली.
नव्या नियमांनुसार, प्राणीजन्य घटकांचा वापर नसलेल्या उत्पादनासाठी हिरवा ठिपका, तर प्राणीजन्य घटक असलेल्या उत्पादनासाठी लाल किंवा तपकिरी ठिपका दर्शवावा लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांना उत्पादनाच्या घटकांच्या उत्पत्तीबाबत पॅकेजिंगवरून सहज माहिती मिळणार आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
पॅकेजच्या दर्शनी भागावर चिन्ह
या चिन्हाचे स्थानही नियमांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. संबंधित रंगीत ठिपका पॅकेजच्या Principal Display Panel (मुख्य दर्शनी भागाच्या) वरच्या बाजूस, ग्राहकाला स्पष्टपणे दिसेल अशा पद्धतीने असणे आवश्यक आहे. यामुळे उत्पादनाची ओळख करण्यासाठी ग्राहकाला पॅकेजवरील माहिती शोधावी लागणार नाही.
कोणत्या उत्पादनांना लागू?
या तरतुदीच्या कक्षेत साबण, शॅम्पू, टूथपेस्ट तसेच इतर कॉस्मेटिक्स आणि टॉयलेटरीज यांचा समावेश आहे. त्यामुळे वैयक्तिक वापराच्या या उत्पादनांमध्ये वापरलेल्या घटकांचा प्राणीजन्य किंवा शाकाहारी स्रोत समजण्यास ग्राहकांना मदत होणार आहे.
कायद्यात नेमकी तरतूद कुठे?
ही व्यवस्था थेट केवळ Legal Metrology Act, 2009 मधील एका कलमात लिहिलेली नसून, या कायद्याच्या अधिकाराखाली तयार करण्यात आलेल्या Legal Metrology (Packaged Commodities) Rules, 2011 मधील तरतुदींमधून लागू करण्यात आली आहे.
Legal Metrology Act, 2009 मधील Section 52(1), read with Section 52(2)(j) and (q) अंतर्गत केंद्र सरकारने पॅकेजिंगसंबंधी नियम करण्याचा अधिकार वापरून Legal Metrology (Packaged Commodities) Rules, 2011 मध्ये वेळोवेळी दुरुस्ती केली आहे. 21 सप्टेंबर 2026 रोजीच्या Fourth Amendment Rules, 2026 मध्ये साबण, शॅम्पू, टूथपेस्ट, कॉस्मेटिक्स आणि टॉयलेटरीजवरील रंगीत ठिपक्याबाबतची तरतूद नव्या पद्धतीने मांडण्यात आली आहे.
2014 पासूनची तरतूद, आता नव्या नियमांत बदल
विशेष म्हणजे साबण, शॅम्पू, टूथपेस्ट आणि इतर कॉस्मेटिक्स व टॉयलेटरीजवर हिरवा किंवा लाल/तपकिरी ठिपका देण्याची मूळ तरतूद 2014 मध्ये Rule 6(8) मध्ये करण्यात आली होती. दिल्ली उच्च न्यायालयाच्या 2026 मधील एका प्रकरणातही या जुन्या तरतुदीचा स्पष्ट उल्लेख आहे.
खाद्यपदार्थांपुरती मर्यादित असलेली शाकाहारी-मांसाहारी ओळख आता दैनंदिन वापरातील साबण, शॅम्पू, टूथपेस्ट आणि कॉस्मेटिक्सपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे ग्राहकांना उत्पादनाची निवड करताना पॅकेजिंगवरूनच अधिक स्पष्ट माहिती मिळणार आहे.
विजय सागर
केंद्रीय कार्यकारिणी सदस्य, अखिल भारतीय ग्राहक पंचायत.
