Sinhgad Institute : ५ कोटींचा पगार हडपल्याचा आरोप; सिंहगड संस्थेचे संस्थापकांविरोधात गुन्हा दाखल
Sinhgad Institute
2 मिनट पठन

Sinhgad Institute : गेल्या साडेपाच वर्षांच्या कालावधीत २७ शिक्षकांचे तब्बल ५ कोटी ६ लाख रुपयांचे वेतन थकवल्याचा प्रकार
पुणे, महाराष्ट्र मिरर
Sinhgad Institute : पुण्यातील नामांकित सिंहगड शिक्षण संस्थेमध्ये शिक्षकांच्या वेतनाचा कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या साडेपाच वर्षांच्या कालावधीत २७ शिक्षकांचे तब्बल ५ कोटी ६ लाख रुपयांचे वेतन थकावून ते हडप केल्याप्रकरणी संस्थेचे संस्थापक मारुती नवले यांच्यासह व्यवस्थापनातील सहा जणांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शिक्षण वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. (Sinhgad Institute maruti navale salary case fir)
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी सिंहगड शिक्षण संस्थेचे संस्थापक मारुती नवले, सचिव सुनंदा मारुती नवले, उपाध्यक्षा रचना नवले-अष्टेकर, उपाध्यक्ष रोहित मारुती नवले, लेखा विभागाचे अधिकारी संजय मोरे आणि शरद जरद यांच्यासह इतर काही विश्वस्तांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध फौजदारी विश्वासघात आणि फसवणुकीच्या कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ( Sinhgad Institute )
काय आहे नेमके प्रकरण?
या संदर्भात सिंहगड स्प्रिंगडेल स्कूलमधील एका शिक्षिकेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे. संबंधित महिला शिक्षक या एप्रिल २०२० पासून या संस्थेत कार्यरत आहेत. तक्रारीत नमूद केल्यानुसार, त्यांना संस्थेकडून नियमितपणे पगार दिला जात नव्हता. ( Sinhgad Institute ) वारंवार मागणी करूनही केवळ आश्वासने दिली जात होती. साडेपाच वर्षांच्या काळात केवळ त्यांची एकट्याचीच १९ लाख ३६ हजार रुपयांची पगाराची रक्कम थकवण्यात आली.
Deputy CM Eknath Shinde Admitted to Hospital
जेव्हा पीडित शिक्षिकेने इतर सहकाऱ्यांशी चर्चा केली, तेव्हा हा प्रकार केवळ त्यांच्यापुरता मर्यादित नसून संस्थेतील इतर अनेक शिक्षकांचीही अशीच पिळवणूक होत असल्याचे समोर आले. शाळेतील एकूण २७ शिक्षकांना गेल्या साडेपाच वर्षांत पूर्ण किंवा नियमित पगार मिळाला नसल्याचे उघड झाले. या सर्व २७ शिक्षकांची मिळून एकूण थकीत आणि अपहार झालेली रक्कम ५ कोटी ६ लाख रुपयांच्या घरात जाते. ( Sinhgad Institute )
आपला हक्काचा पगार मिळावा यासाठी पीडित शिक्षकांनी गेली कित्येक वर्षे संस्थेच्या व्यवस्थापनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. संस्थापक मारुती नवले यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनेकदा भेटी घेऊन हक्काचे पैसे देण्याची विनंती केली गेली. मात्र, व्यवस्थापनाकडून केवळ तारखा आणि पोकळ आश्वासने दिली जात होती. ( Sinhgad Institute )
हेही वाचा: Pune News : पीएमसीची १५ खाजगी रुग्णालयांना नोटीस; उपचारांचे दरपत्रक लपवणे पडले महागात
संस्थेकडून न्याय मिळत नसल्याचे पाहून हताश झालेल्या शिक्षकांनी अखेर विविध शैक्षणिक आणि शासकीय प्राधिकरणांकडे दाद मागितली. तेथेही तोडगा न निघाल्यामुळे, कायदेशीर मार्गाने लढा देण्याचा निर्णय घेत शिक्षकांनी भारती विद्यापीठ पोलिसांशी संपर्क साधला आणि आपली फसवणूक झाल्याची तक्रार दिली. ( Sinhgad Institute )
Ashadhi Wari 2026 : पालखी सोहळ्यानिमित्त जादा बसेसचे नियोजन
शिक्षकांच्या तक्रारीची दखल घेत भारती विद्यापीठ पोलिसांनी प्रथम या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली. बँकेचे व्यवहार, शिक्षकांची नियुक्तीपत्रे आणि थकीत वेतनाची आकडेवारी यांची प्राथमिक पडताळणी केल्यानंतर, पोलिसांनी सिंहगड शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
https://www.instagram.com/p/DaV25xTM72K
या संपूर्ण प्रकरणाचा तपास भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
