मुख्य सामग्री पर जाएँ

Pune News : राधानंद कला गौरव पुरस्काराने गायिका ललिता जगदाळे सन्मानित.

Pune News : पुणे : राधानंद कला प्रतिष्ठान (ट्रस्ट) च्या प्रथम वर्धापन दिना निमित्ताने राधानंद कला गौरव पुरस्कार व ‘मन चाहें गीत’ या सुरेल गाण्यांच्या मैफीलीचे आयोजन पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात करण्यात आले.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

राधानंद कला गौरव पुरस्काराने गायिका ललिता जगदाळे सन्मानित.
राधानंद कला गौरव पुरस्काराने गायिका ललिता जगदाळे सन्मानित.

Pune News : पुणे : राधानंद कला प्रतिष्ठान (ट्रस्ट) च्या प्रथम वर्धापन दिना निमित्ताने राधानंद कला गौरव पुरस्कार व ‘मन चाहें गीत’ या सुरेल गाण्यांच्या मैफीलीचे आयोजन पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात करण्यात आले. ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष आणि आयोजक आनंद पंडित आणि उपाध्यक्षा ममता बोरगावकर यांच्या हस्ते गायिका ललिता जगदाळे यांना स्मृतिचिन्ह, श्रीफळ, शाल देऊन राधानंद कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी संस्थेचे सचिव विवेक सुतार, खजिनदार संजय नवले, विश्वस्त प्रसाद कुलकर्णी, मधुकर नाईक, भारत गायकवाड, किरण बोंबले आणि करुणा शिर्के उपस्थित होते.https://maharashtramirror.com/ Pune News

सांस्कृतिक बरोबरच सामाजिक क्षेत्रात ही राधानंद संस्था कार्यरत असून उभरत्या कलाकारांना व्यासपीठ देण्याच्या उद्देश्याने प्रतिष्ठानाची स्थापना करण्यात आल्याचे आनंद पंडित यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. कार्यक्रमाची सुरवात सुरभी विवेक सुतार हिने नृत्यातून सादर केलेल्या गणेशवंदनेने करण्यात आली. त्या नंतर संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच पुरस्कारार्थी ललिता जगदाळे, अश्विनी भुजबळ, विद्या बोरगावकर, पूर्वा केसकर, रविराज आणि प्रसाद माने यांनी हिंदी आणि मराठी सदाबहार गाणी सादर केली. विवेक सुतार यांनी सूत्रसंचालन केले.

शेयर करें