मुख्य सामग्री पर जाएँ

Shivsena : पुण्यात ठाकरे गटाला वाचवण्यासाठी वसंत मोरे 'सरसावले'!

वसंत मोरेंवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिली मोठी जबाबदारी ?

म
मुबारक

3 मिनट पठन

Shivsena
Shivsena

Shivsena : सचिन अहिर यांच्या पक्षबदलानंतर वसंत मोरेंकडून निष्ठावंतांसाठी 'मातोश्री दर्शन' मोहीम

वसंत मोरेंवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिली मोठी जबाबदारी?

Shivsena

पुणे, महाराष्ट्र मिरर
कालपर्यंत पुण्यातील पक्ष संघटना, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बैठकींचे नियोजन करणारे सचिन अहिर यांनी अचानक पक्षांतर केल्याने पदाधिकारी आणि शिवसैनिकांमध्ये (Shivsena) संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुण्यातील ठाकरे गटासाठी हा मोठा संघटनात्मक धक्का मानला जात आहे. दरम्यान शहरप्रमुख वसंत मोरे यांनी पक्ष वाचवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील 130 ज्येष्ठ शिवसैनिक मातोश्रीवर लवकरच दाखल होणार आहेत. (shivsena ubt sachin ahir exit vasant more matoshree yatra)

Vasant More and Udhav Thakarey

२०२२ पासून सुरु झालेली ठाकरे गटाची गळती अद्यापही सुरूच असल्याचे चित्र आहे. अलीकडेच पक्षाच्या सहा खासदारांनीही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेत(Shivsena) प्रवेश केला होता. "उद्धव ठाकरे भेटत नाहीत आणि वेळ देत नाहीत," हे कारण देत अनेक ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Pune Rain Update: पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम

निष्ठावंत शिवसैनिकांना एकत्र ठेवण्यासाठी पाऊल
या पार्श्वभूमीवर पुण्यातील निष्ठावंत शिवसैनिकांना एकत्र ठेवण्यासाठी ठाकरे गटाचे महानगरप्रमुख वसंत मोरे यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष स्थापन केल्यापासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या ६० वर्षांवरील सुमारे १३० ज्येष्ठ शिवसैनिकांसाठी 'मातोश्री दर्शन' यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमाद्वारे पक्षाशी दीर्घकाळ निष्ठा राखणाऱ्या ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान करण्याबरोबरच संघटना अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे. पुण्यातील बदलत्या राजकीय घडामोडींमध्ये या यात्रेकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

माध्यमांशी संवाद साधताना यावेळी वसंत मोरे म्हणाले ,‘काहीजण पक्ष सोडून गेले असले, तरी पक्ष पुन्हा उभा राहील. पक्षनिष्ठा कशी आहे, हे दाखविण्यासाठी पुण्यातील १३० ज्येष्ठ शिवसैनिकांसाठी येत्या रविवारी (पाच जुलै) ‘चलो मातोश्री दर्शन’ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खुर्चीचे दर्शन घेण्याची इच्छा या ज्येष्ठ शिवसैनिकांनी व्यक्त केली. (Shivsena)

हेही वाचा: Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla : पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल

त्यानुसार या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातून हे ज्येष्ठ शिवसैनिक मातोश्री येथे गेल्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. ज्येष्ठ शिवसैनिकांच्या या निर्धारामुळे पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण होईल. अशी भावनादेखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. (Shivsena)

पुण्यात शिवसेना (ठाकरे) बॅकफूटवर
१९९५ मध्ये एकाच वेळी तीन आमदार निवडून आणणाऱ्या आणि २००७ च्या महापालिका निवडणुकीत २० नगरसेवकांसह आपले बस्तान बसवणाऱ्या शिवसेनेची पुण्यातील ताकद आता कमालीची घटली आहे.

आधीच पक्षातील मोठ्या फुटीनंतर पुण्यात संघटनात्मक पातळीवर पीछेहाट झाली असताना, आता पक्षाला बळकटी देण्यासाठी धडपडणारे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनीच पक्ष सोडल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासमोर पुण्यात मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर आता पक्षाची पडझड रोखण्यासाठी पुण्यातील ज्येष्ठ शिवसैनिक स्वतःहून पुढे आले आहेत.(Shivsena)

दुर्लक्षाची कबुली आणि माजी नगरसेवकांचे पक्षांतर
शिवसेना दुभंगल्यानंतर पुण्याकडे काहीसे दुर्लक्ष झाल्याची बाब स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मान्य केली होती. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी 'पुण्याकडे विशेष लक्ष देईन', असे आश्वासनही दिले होते. मात्र, २०१७ च्या पुणे महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या शिवसेनेच्या (Shivsena) १० नगरसेवकांपैकी बहुतेकांनी आधीच इतर पक्षांची वाट धरली आहे. यामध्ये:

काँग्रेस प्रवेश: अविनाश साळवे

भाजप प्रवेश: विशाल धनवडे, बाळा ओसवाल, प्राची अल्हाट, पल्लवी जावळे, संगीता ठोसर, पृथ्वीराज सुतार आणि संजय भोसले.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार): श्वेता चव्हाण

शिवसेना (शिंदे): प्रमोद उर्फ नाना भानगिरे

या मोठ्या गळतीनंतर सध्या पुणे महापालिकेत या पक्षाचे नितीन गावडे हे एकमेव नगरसेवक उरले आहेत.

अहिर यांच्या जाण्याने 'संपर्क' तुटला
पुण्यात पक्षाची विस्कळीत झालेली घडी पुन्हा बसवण्यासाठी जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून सचिन अहिर प्रयत्नशील होते. परंतु, त्यांनीच आता पक्षाला 'जय महाराष्ट्र' केल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेची मोठी कोंडी झाली आहे. नव्या संपर्कप्रमुखाचा शोध घेण्याचे मोठे आव्हान आता पक्षनेतृत्वासमोर आहे.

Pune News: पुणेकरांनो लक्ष द्या! जहांगीर चौक ते मंगलदास चौक रस्ता वाहतुकीसाठी बंद

ज्येष्ठ शिवसैनिक मैदानात
दिवसेंदिवस पुण्यात पक्षाची ताकद क्षीण होत चालल्याने आणि मातब्बर नेते सोडून गेल्याने आता पक्षाची धुरा निष्ठावंत आणि ज्येष्ठ शिवसैनिकांनी आपल्या हातामध्ये घेण्याचे ठरवले आहे. संघटना जिवंत ठेवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा उमेद निर्माण करण्यासाठी हे ज्येष्ठ नेते आता रणांगणात उतरले आहेत.

https://www.instagram.com/p/DaSdftMNxOS

https://www.facebook.com/share/r/18tNjPB224/

शेयर करें