Pune Crime : शिवणेत वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेचा छापा; पीडितेची सुटका
Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर: शिवणे परिसरातील एका सदनिकेत सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसायावर पुणे शहर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाने छापा टाकला.
2 मिनट पठन

Pune Crime : एक पुरुष, दोन महिला अटकेत; उत्तमनगर पोलिसांत पोक्सोसह विविध कलमांन्वये गुन्हा
Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर: शिवणे परिसरातील एका सदनिकेत सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसायावर पुणे शहर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाने छापा टाकला. या कारवाईत एका पीडितेची सुटका करण्यात आली असून, एक पुरुष आणि दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. उत्तमनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध अधिनियम आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यातील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune Crime

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाला १० सप्टेंबर रोजी शिवणे येथील उत्तमनगर-शिवणे रस्त्यावरील साई श्रद्धा अपार्टमेंटमधील एका सदनिकेत पीडितेकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने प्राथमिक पडताळणी केली. त्यानंतर बनावट ग्राहकाच्या मदतीने माहितीची खात्री करण्यात आली. https://maharashtramirror.com/ Pune crime
माहितीची खातरजमा झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित सदनिकेवर अचानक छापा टाकला. कारवाईदरम्यान तेथे असलेल्या एका पीडितेची पोलिसांनी सुटका केली. या प्रकरणात पिंटू ज्ञानदेव चव्हाण (वय ३८, रा. शिवणे), इंदू संतोष निखरे (वय ५२) आणि आणखी एका ४० वर्षीय महिलेला पोलिसांनी अटक केली. पीडितेची ओळख आणि तिच्याशी संबंधित संवेदनशील माहिती कायदेशीर तरतुदींनुसार गोपनीय ठेवण्यात आली आहे.https://maharashtramirror.com/ Pune crime
याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७१/२०२६ नोंदविण्यात आला आहे. पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १४३ (१), १४३ (३), ३ (५), अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध अधिनियम, १९५६ मधील कलम ४ आणि ५ तसेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यातील कलम ४ आणि १७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणात पोक्सो कायद्याची कलमे लावण्यात आल्याने पीडितेची ओळख उघड होणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.
या प्रकरणात आरोपींची नेमकी भूमिका, पीडितेला संबंधित ठिकाणी कशा प्रकारे आणण्यात आले, हा प्रकार किती दिवसांपासून सुरू होता तसेच यामागे आणखी व्यक्ती किंवा कोणते नेटवर्क कार्यरत आहे का, या अनुषंगाने पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे. अनैतिक मानवी वाहतूक आणि वेश्याव्यवसायासाठी पीडितांचा वापर करणाऱ्यांविरोधात गुन्हे शाखेकडून सातत्याने कारवाई केली जात आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-३) शंकर खटके, पोलीस निरीक्षक आशालता खापरे, सहायक पोलीस निरीक्षक विक्रम मिसाळ तसेच पोलीस अंमलदार ईश्वर आंधळे, तुषार भिवरकर, बबनराव केदार, इम्रानखान नदाफ, अविनाश कोंडे, किरण बरडे आणि महिला पोलीस अंमलदार वैशाली इंगळे व रेश्मा कंक यांच्या पथकाने केली.
