मुख्य सामग्री पर जाएँ

Beed News : बीडमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या माजी तालुकाप्रमुखांचा मृत्यू; कारणांचा पोलिसांकडून तपास

Beed News : बीड : जिल्ह्यातील राजकीय वर्तुळातून धक्कादायक घटना समोर आली आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

बीडमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या माजी तालुकाप्रमुखांचा मृत्यू; कारणांचा पोलिसांकडून तपास पोलिसांकडून पंचनामा; तपास सुरू
बीडमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या माजी तालुकाप्रमुखांचा मृत्यू; कारणांचा पोलिसांकडून तपास पोलिसांकडून पंचनामा; तपास सुरू

Beed News : पोलिसांकडून पंचनामा; तपास सुरू

Beed News : बीड : जिल्ह्यातील राजकीय वर्तुळातून धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी तालुकाप्रमुख शिवाजीराव शिंदे यांचा राहत्या घरी मृत्यू झाला. त्यांनी गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर बीडसह महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मात्र, त्यांनी हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच बीड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, मृत्यूमागील कारणांचा तपास सुरू आहे. पोलिसांच्या तपासानंतरच या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. शिवाजीराव शिंदे यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेयर करें