Rajya Sabha Election 2026: राज्यसभेला शिंदेंचे 'धक्कातंत्र'! ज्योती वाघमारे आणि रोहित टिळकांना उमेदवारी; शरद पवारांविरुद्ध रंगणार 'दुसऱ्या' जागेचा थरार
Rajya Sabha Election 2026: ज्येष्ठांना डावलून नव्या चेहऱ्यांवर विश्वास | रोहित टिळकांच्या उमेदवारीने पुण्याच्या राजकारणात खळबळ | दुसऱ्या जागेसाठी शिंदेंना हवीत केवळ 9 अतिरिक्त मते
1 मिनट पठन

Rajya Sabha Election 2026: ज्येष्ठांना डावलून नव्या चेहऱ्यांवर विश्वास | रोहित टिळकांच्या उमेदवारीने पुण्याच्या राजकारणात खळबळ | दुसऱ्या जागेसाठी शिंदेंना हवीत केवळ 9 अतिरिक्त मते
मुंबई :- राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली चाल खेळली आहे. शिवसेनेच्या वाट्याला असलेल्या एका जागेसाठी सोलापूरच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. मात्र, केवळ एक जागा न लढवता शिंदे यांनी पुण्याचे रोहित टिळक यांनाही अर्ज भरण्याच्या सूचना देऊन दुसऱ्या जागेवरही दावा ठोकला आहे. यामुळे आता सातव्या जागेसाठीची लढत अत्यंत रंजक झाली असून, रोहित टिळक विरुद्ध शरद पवार असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
कोण आहेत शिंदेंचे उमेदवार?
1.ज्योती वाघमारे: सोलापूरच्या पक्षाच्या प्रवक्त्या असून त्या दलित समाजाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांना उमेदवारी देऊन शिंदे यांनी पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्याला संधी देण्याचा संदेश दिला आहे.
2.रोहित टिळक: लोकमान्य टिळकांचे पणतू आणि मूळचे काँग्रेसचे असलेले रोहित टिळक यांना शिंदे गटाने संधी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे ब्राह्मण समाजासह पुण्यातील राजकीय समीकरणे आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न शिंदेंनी केला आहे.
विजयाचं गणित आणि पेच
राज्यसभेची एक जागा निवडून आणण्यासाठी 37 मतांची गरज आहे.
शिंदे गटाची पहिली जागा: ज्योती वाघमारे यांच्यासाठी शिंदेंकडे पुरेसे संख्याबळ आहे.
दुसरी जागा (रोहित टिळक): शिंदे गटाला दुसऱ्या जागेसाठी केवळ 9 मतांची आवश्यकता आहे. ही मते अपक्ष किंवा महायुतीतील अतिरिक्त मतांमधून जुळवण्याचे मोठे आव्हान शिंदेंसमोर असेल. रोहित टिळकांचा थेट सामना आता शरद पवार यांच्याशी होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
महायुती आणि मविआचे अन्य शिलेदार
भाजप: विनोद तावडे, रामदास आठवले, रामराव वडकुते आणि माया इवनाते.
राष्ट्रवादी (अजित पवार गट): पार्थ पवार.
महाविकास आघाडी: शरद पवार.
निवडणुकीचे महत्त्वाचे टप्पे
5 मार्च (आज): उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस.
16 मार्च: सकाळी 9 ते 4 मतदान आणि संध्याकाळी 5 नंतर मतमोजणी.
