मुख्य सामग्री पर जाएँ

Pune Crime : शेअर गुंतवणुकीच्या आमिषाने शिक्षकाला १६.२४ लाखांचा गंडा

Pune Crime : पिंपरी, महाराष्ट्र मिरर : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली एका शिक्षकाची १६ लाख २४ हजार ६०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

शेअर गुंतवणुकीच्या आमिषाने शिक्षकाला १६.२४ लाखांचा गंडा
शेअर गुंतवणुकीच्या आमिषाने शिक्षकाला १६.२४ लाखांचा गंडा

Pune Crime : हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Pune Crime : पिंपरी, महाराष्ट्र मिरर : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली एका शिक्षकाची १६ लाख २४ हजार ६०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. ही घटना १३ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत मारुंजी परिसरात घडली.https://maharashtramirror.com/ Pune Crime

लवकुश शिवबली सिंह (वय ४९, रा. मारुंजी, ता. मुळशी) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने फिर्यादीशी व्हॉट्सॲपवर संपर्क साधला. त्यांना शेअर गुंतवणुकीसाठी एक ॲप डाउनलोड करण्यास सांगितले. वेगवेगळ्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी करून शेअर्स खरेदीच्या नावाखाली त्यांच्या पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यातून विविध व्यवहारांद्वारे १६ लाख २४ हजार ६०० रुपये पाठविण्यास भाग पाडले. त्यानंतर फसवणूक झाल्याचे समोर आले.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेयर करें