मुख्य सामग्री पर जाएँ

Mumbai News : शरद पवारांचा स्पष्ट निर्वाळा; राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणेच लढणार

Mumbai News : मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाची नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

शरद पवारांचा स्पष्ट निर्वाळा; राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणेच लढणार
शरद पवारांचा स्पष्ट निर्वाळा; राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणेच लढणार

Mumbai News : मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाची नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती तसेच दुष्काळ निवारणासाठी करावयाच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.https://maharashtramirror.com/ Mumbai news

बैठकीला मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केले. तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत आणि एनडीएसोबत जाण्याच्या चर्चांवरही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली.https://maharashtramirror.com/ Mumbai News

बैठकीत बोलताना शरद पवार म्हणाले, “मघाशी बोलताना प्रांताध्यक्षांनी एक वाक्य वापरले. ते बोलता बोलता म्हणाले की, आमच्यामध्ये काही उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. पक्षाचा प्रमुख म्हणून मी स्पष्ट सांगतो की, ज्या चर्चा सुरू आहेत, त्या म्हणजे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक शक्तिशाली करण्यासंदर्भात आहेत.”

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांवरही पवार यांनी रोखठोक भूमिका मांडली. ते म्हणाले, “तुम्ही आमच्यात आले तर ठीक; नाहीतर ज्यांना यायचे असेल त्यांनी आमच्यात यावे. आम्ही कुणाच्यात जाणार नाही आणि आमचा पक्ष स्वतंत्र पक्ष म्हणूनच लढणार आहे.”

शरद पवार यांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य विलीनीकरण तसेच एनडीएसोबत जाण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा पूर्णविराम मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेयर करें