मुख्य सामग्री पर जाएँ

Pune News : संवाद झाला नाही तर प्रश्न सुटणार नाहीत’; एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर शरद पवारांचे प्रतिपादन

Pune News :पुणे: पुण्यात गेल्या काही दिवसांपासून विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या एमपीएससी (एमपीएससी) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला तत्काळ मार्ग काढण्याचे आवाहन केले आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

‘संवाद झाला नाही तर प्रश्न सुटणार नाहीत’; एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर शरद पवारांचे प्रतिपादन
‘संवाद झाला नाही तर प्रश्न सुटणार नाहीत’; एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर शरद पवारांचे प्रतिपादन

Pune News :पुणे: पुण्यात गेल्या काही दिवसांपासून विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या एमपीएससी (एमपीएससी) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला तत्काळ मार्ग काढण्याचे आवाहन केले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

“विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधल्याशिवाय आणि त्यांच्या समस्या ऐकून घेतल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत,” असे स्पष्ट करत शरद पवार यांनी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांमध्ये तातडीने लक्ष घालण्याची विनंती केली.https://maharashtramirror.com/ Pune News

पुण्यात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने शरद पवार यांची भेट घेऊन परीक्षांमधील अनियमतता, रखडलेल्या भरती प्रक्रिया आणि विद्यार्थ्यांच्या इतर मागण्यांबाबत सविस्तर माहिती दिली होती. विद्यार्थ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. मुख्यमंत्री सध्या नागपूर दौऱ्यावर असून ते मुंबईत परतल्यानंतर या विषयावर तातडीने बैठक घेऊन तोडगा काढतील, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.

पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, लाखो तरुण-तरुणी आपले भविष्य घडवण्यासाठी दिवस-रात्र अभ्यास करत असतात. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता असणे आणि वेळेवर भरती होणे ही त्यांची रास्त मागणी आहे. विद्यार्थ्यांना न्याय देणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे. सरकारने या प्रश्नाकडे केवळ एक आंदोलन म्हणून न बघता विद्यार्थ्यांच्या भविष्याचा सहानुभूतीने विचार करायला हवा.

दुसरीकडे, या आंदोलनाला महाविकास आघाडीतील इतर घटकांनी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही पाठिंबा दर्शवला आहे. मुंबई आणि पुण्यात राजकीय वातावरण तापले असून, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. मात्र, शरद पवार यांच्या पुढाकारानंतर आता राज्य सरकार सोमवारी यावर काय निर्णय घेते, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेयर करें