मुख्य सामग्री पर जाएँ

Satara News : सातारा जिल्हा बँकेत शिंदेंच्या शिवसेनेचा पहिला मोठा विजय! शंभूराज देसाईंनी भाजपला दिला धक्का; ४२ वर्षांनंतर पाटणमध्ये देसाई गटाची बाजी

Satara News :सातारा : अहिल्यानगर, सातारा आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणूक निकालांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असतानाच साताऱ्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पहिला मोठा विजय मिळवला आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

सातारा जिल्हा बँकेत शिंदेंच्या शिवसेनेचा पहिला मोठा विजय! शंभूराज देसाईंनी भाजपला दिला धक्का; ४२ वर्षांनंतर पाटणमध्ये देसाई गटाची बाजी
सातारा जिल्हा बँकेत शिंदेंच्या शिवसेनेचा पहिला मोठा विजय! शंभूराज देसाईंनी भाजपला दिला धक्का; ४२ वर्षांनंतर पाटणमध्ये देसाई गटाची बाजी

Satara News :सातारा : अहिल्यानगर, सातारा आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणूक निकालांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असतानाच साताऱ्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पहिला मोठा विजय मिळवला आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बाजी मारत भाजपला जोरदार धक्का दिला आहे. पाटण विकास सेवा सोसायटी मतदारसंघातील अटीतटीच्या लढतीत त्यांनी भाजपचे पारंपरिक प्रतिस्पर्धी सत्यजितसिंह पाटणकर यांचा पराभव केला.https://maharashtramirror.com/ Satara News

५८ मतांसह शंभूराज देसाई विजयी!


पाटण विकास सेवा सोसायटी मतदारसंघात शंभूराज देसाई आणि सत्यजितसिंह पाटणकर यांच्यात प्रतिष्ठेची लढत रंगली होती. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत एकूण १०३ ठरावांपैकी ५८ ठराव शंभूराज देसाई यांच्या बाजूने झाले. त्यामुळे अवघ्या एका तासात निकाल स्पष्ट झाला आणि देसाई यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले.या विजयामुळे पाटण तालुक्यात देसाई गटाने आपले राजकीय वर्चस्व पुन्हा अधोरेखित केले आहे. विशेष म्हणजे, तब्बल ४२ वर्षांनंतर पाटणमध्ये देसाई गटाला जिल्हा बँकेच्या निवडणुकीत यश मिळाल्याने या निकालाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे..https://maharashtramirror.com/ Satara News

कार्यकर्त्यांचा गुलाल उधळत जल्लोष!


शंभूराज देसाई यांच्या विजयाची बातमी समजताच मतदान केंद्राबाहेर समर्थकांनी एकच जल्लोष केला. 'शंभूराज देसाई साहेब पुढे चला' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि पेढे वाटून विजयाचा आनंद साजरा केला.

भाजपसाठी मोठा राजकीय धक्का!


या निवडणुकीत सत्यजितसिंह पाटणकर यांचा झालेला पराभव हा भाजपसाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. तर दुसरीकडे शंभूराज देसाई यांच्या विजयामुळे सातारा जिल्हा बँकेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद वाढण्याची शक्यता आहे. या निकालाचे पडसाद आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत तसेच विविध सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये उमटण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. साताऱ्यातील या विजयाने शिंदे गटाने सहकार क्षेत्रातील राजकीय लढाईत खाते उघडले असून, आता अहिल्यानगर आणि सांगली जिल्हा बँकेच्या निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेयर करें