मुख्य सामग्री पर जाएँ

रास्ता पेठेतील छत्रपती शाहू महाराज जलतरण तलाव बंद करू नये: प्रशांत जगताप

ठेकेदाराकडून तलावाचे व्यवस्थापन महानगरपालिका प्रशासनाने स्वतःकडे घ्यावे अशी सूचना मांडली

पघ
प्रशिक घस्ते

1 मिनट पठन

रास्ता पेठेतील छत्रपती शाहू महाराज जलतरण तलाव बंद करू नये: प्रशांत जगताप

ठेकेदाराकडून तलावाचे व्यवस्थापन महानगरपालिका प्रशासनाने स्वतःकडे घ्यावे अशी सूचना मांडली

निलेश राऊत
पुणे: रास्ता पेठेतील छत्रपती शाहू महाराज जलतरण तलावाचे व्यवस्थापन गेल्या अनेक वर्षांपासून एका खाजगी कंत्राटदाराकडे आहे. या तलावाच्या कंत्राटाची मुदत २०२४ सालीच संपुष्टात आलेली असताना, आजपर्यंत या जलतरण तलावाचे व्यवस्थापन त्याच कंत्राटदाराकडे कसे? हा मुद्दा सभागृह नेते गणेश बिडकर यांनी स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित केला. या विषयावर महानगरपालिका आयुक्तांनी प्रतिक्रिया देत तातडीने जलतरण तलाव सिल करण्याची भूमिका मांडली.

दरम्यान प्रशांत जगताप यांनी प्रशासनाच्या या भूमिकेवर आक्षेप घेत स्थानिक नागरिकांच्या हिताचे प्रश्न उपस्थित केले. उन्हाळ्याच्या सुट्टीत रास्ता पेठ व परिसरातील अनेक बालके या जलतरण तलावात पोहण्यासाठी येतात. महानगरपालिका प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराचा फटका या बालकांना बसू नये. ठेकेदाराकडून जलतरण तलावाचे व्यवस्थापन महानगरपालिका प्रशासनाने स्वतःकडे घ्यावे अशी सूचना प्रशांत जगताप यांनी मांडली. या सूचनेवर सकारात्मक विचार केला जाईल असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.

Chhatrapati Shahu Maharaj swimming pool in Rasta Peth should not be closed: Prashant Jagtap

शेयर करें