कॅफे मध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
रावेत येथील ब्ल्यू बेरी कॅफेत घटना घडली
1 मिनट पठन

रावेत येथील ब्ल्यू बेरी कॅफेत घटना घडली
पिंपरी: रावेत येथील एका कॅफे मध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीने घटनेच्या २० दिवसानंतर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली असता या प्रकरणाला वाचा फुटली आहे. ही घटना १८ एप्रिल रोजी दुपारी रावेत मधील ब्ल्यू बेरी कॅफे मध्ये घडली.

याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार १७ वर्षीय मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलाने पीडित अल्पवयीन मुलीला रावेत येथील ब्ल्यू बेरी कॅफे मध्ये नेले. तिथल्या एका खोलीत नेऊन त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. मुलीने ७ मे रोजी पोलीस ठाण्यात येऊन याबाबत माहिती दिली असता भारतीय न्याय संहिता, पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
