मुख्य सामग्री पर जाएँ

Satara Crime : अलिशान कारमधून आलेल्या चोरट्यांनी एटीएम फोडत रोकड लांबवली

पुणे, महाराष्ट्र मिरर Satara Crime : फॉर्च्युनर गाडीमधून आलेल्या एका टोळीने बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम फोडत दोन लाख ३४ हजार ४०० रुपयांची चोरी केल्याची घटना सातारा जिल्ह्यातील खंडाळ्यामध्ये घडली.

वज
विदुला जगदाळे

1 मिनट पठन

Satara Crime : अलिशान कारमधून आलेल्या चोरट्यांनी एटीएम फोडत रोकड लांबवली

खंडाळ्यातील घटना

पुणे, महाराष्ट्र मिरर Satara Crime : फॉर्च्युनर गाडीमधून आलेल्या एका टोळीने बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम फोडत दोन लाख ३४ हजार ४०० रुपयांची चोरी केल्याची घटना सातारा जिल्ह्यातील खंडाळ्यामध्ये घडली. याप्रकरणी खंडाळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.Satara Crime

बँक ऑफ महाराष्ट्र खंडाळा शाखेच्या अधिकारी मेरी सिन्हा यांनी याबाबत फिर्याद दिली.

खंडाळा येथे बुधवारी (दि.२९) पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास फॉर्च्युनरसारख्या अलिशान गाडीमधून आलेल्या एका टोळीने बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएममध्ये प्रवेश केला.चेहरे दिसू नयेत म्हणून सीसीटीव्हीवर कलर स्प्रे मारत, सायनच्या वायर तोडल्या. त्यानंतर गॅस कटरच्या साह्याने एटीएमचा पुढील भाग कापला. त्यामधून दोन लाख ३४ हजार ४०० रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. दरम्यान, एटीएम तोडल्याचा अलार्म बँक ऑफ महाराष्ट्रच्या हैदराबार येथील मुख्य शाखेत वाजला. दरम्यान, त्यांच्याकडून पोलिसांना माहिती कळवेपर्यंत चोरट्यांनी पलायन केले होते.Satara Crime

या घटनेची माहिती मिळताच फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी धन्यकुमार गोडसे, खंडाळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष म्हस्के आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक विभागही दाखल झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष म्हस्के या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Satara Crime

शेयर करें