मुख्य सामग्री पर जाएँ

खुनाचा कट रचणाऱ्या सराईत टोळीला शस्त्रसाठ्यासह अटक

टोळी सदस्यांवर यापूर्वी १७ गुन्ह्यांची नोंद

पघ
प्रशिक घस्ते

1 मिनट पठन

Vasai Crime News

टोळी सदस्यांवर यापूर्वी १७ गुन्ह्यांची नोंद

पिंपरी: पिस्तुल आणि कोयत्यासह एका तरुणाचा खून करण्याचा कट रचत असलेल्या ६ जणांच्या टोळीला पोलिसांनी थेरगाव येथे रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी (२५ एप्रिल) पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास बारणे कॉर्नर जवळील मोकळ्या मैदानात करण्यात आली. टोळी सदस्यांवर विविध गंभीर स्वरूपाचे १७ गुन्हे दाखल आहेत.

गंभीर स्वरूपाचे १० गुन्हे दाखल असणारा ऋषिकेश महादेव चव्हाण (२७, थेरगाव, पुणे), ३ गुन्हे दाखल असणारा ऋषिकेश हरी आटोळे (२३, थेरगाव, पुणे), गंभीर स्वरूपाचे ४ गुन्हे दाखल असणारा करण उमेश वाघमारे (२४, बिबवेवाडी, पुणे), अमित मधुकर कदम (१८, थेरगाव, पुणे), यश राहुल साळवे (१८, थेरगाव, पुणे) आणि श्रवण रवी दोडमनी (२०, किवळे, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस शिपाई रमेश ब्राह्मण यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व आरोपी बारणे कॉर्नर थेरगाव येथे विकी रामप्रसाद मल या तरुणाचा खून करण्याचा कट रचण्यासाठी एकत्र जमले होते. या कटाबाबत काळेवाडी पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा लावून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १ गावठी पिस्तुल, १ जिवंत काडतूस आणि २ लोखंडी कोयते जप्त करण्यात आले आहेत. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.

Sarai gang planning murder arrested with weapons

शेयर करें