मुख्य सामग्री पर जाएँ

Sanju Samson : "विराट-रोहितला डगआउटमध्ये बसून पाहिलं आणि शिकलो!"; विजयानंतर संजू सॅमसन भावूक; आपल्या यशाचं गुपित केलं उघड

Sanju Samson On Virat Kohli : सामनावीर संजू सॅमसनने मानले दिग्गजांचे आभार | "100 सामने फक्त बघून खूप काही शिकलो" | आयुष्यातील सर्वोत्तम दिवसांपैकी एक असल्याची दिली पावती

व
विवेक

2 मिनट पठन

Sanju Samson : "विराट-रोहितला डगआउटमध्ये बसून पाहिलं आणि शिकलो!"; विजयानंतर संजू सॅमसन भावूक; आपल्या यशाचं गुपित केलं उघड

Sanju Samson On Virat Kohli : सामनावीर संजू सॅमसनने मानले दिग्गजांचे आभार | "100 सामने फक्त बघून खूप काही शिकलो" | आयुष्यातील सर्वोत्तम दिवसांपैकी एक असल्याची दिली पावती

Sanju Samson best inning T-20 :- वेस्ट इंडिजविरुद्धच्या निर्णायक सामन्यात 50 चेंडूत नाबाद 97 धावांची खेळी करून भारताला सहाव्यांदा टी-20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये पोहोचवणारा संजू सॅमसन आज खऱ्या अर्थाने चमकला. बराच काळ संघात असूनही अंतिम 11 मध्ये संधी न मिळालेल्या संजूने मिळालेल्या संधीचे सोने केले. सामन्यानंतर बोलताना त्याने आपल्या 10 वर्षांच्या प्रवासातील अनुभवांचे पदर उलगडले.

विराट आणि रोहितकडून घेतलेली शिकवण

संजूने आपल्या कामगिरीचे श्रेय रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना दिले. तो म्हणाला,"मी गेल्या 10 वर्षांपासून भारतीय संघासोबत आहे. अनेकदा मला मैदानात खेळण्याची संधी मिळाली नाही, पण डगआउटमध्ये बसून मी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारख्या दिग्गजांचे बारकाईने निरीक्षण केले. ते कठीण परिस्थितीत सामना कसा संपवतात आणि परिस्थितीनुसार खेळ कसा बदलतात, हे पाहून मी खूप काही शिकलो. मी 50-60 सामने खेळलो असेन, पण जवळपास 100 सामने फक्त बाहेर बसून पाहिले आहेत, ज्याचा फायदा आज झाला."

मैदानावरील रणनीती: प्रक्रियेवर भर

196 धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना एका टोकाकडून विकेट्स पडत होत्या. त्यावेळच्या मानसिकतेबद्दल संजूने सांगितले की, "आजचा सामना वेगळा होता. जेव्हा मी गती वाढवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा विकेट्स पडू लागल्या. त्यामुळे केवळ भागीदारी रचणे आणि माझ्या नैसर्गिक प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे होते. मी काहीतरी अघोरी करण्याचा विचार केला नाही; फक्त प्रत्येक चेंडूचा स्वतंत्र विचार केला."

नकारात्मक विचारांवर मात

सामन्याच्या दडपणाखाली असताना मनात येणाऱ्या शंकांबद्दल संजूने प्रांजळ कबुली दिली. "प्रेक्षकांचा पाठिंबा ऊर्जा देतो, पण मनात कधीकधी 'जर जमले नाही तर?' असा विचार येतो. अशा वेळी मी स्वतःला वर्तमानात आणत होतो आणि फक्त चेंडूकडे लक्ष देत होतो. आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवसांपैकी एक आहे," असे त्याने नमूद केले.

संजूचा विश्वचषकातील प्रवास

अभिषेक शर्मा सातत्याने अपयशी ठरत असल्याने संजूला संघात स्थान मिळाले. नामिबियाविरुद्धच्या कामगिरीनंतर वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने ज्या पद्धतीने संयमी आणि आक्रमक खेळ केला, त्याने निवडकर्त्यांना चोख उत्तर दिले आहे. विश्वचषकाची प्रदीर्घ प्रतीक्षा आणि त्यानंतर थेट देशाला सेमीफायनलमध्ये नेऊन ठेवणे, हा संजूचा प्रवास भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी सुखद धक्का ठरला आहे.

शेयर करें