मुख्य सामग्री पर जाएँ

Sanjay Raut : संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार: "कागद काय दाखवता? आम्ही जमिनीवर लढतो!"; हिंदी सक्तीचा निर्णय मोदी-शाहांचाच, फडणवीसांचं विधान म्हणजे निव्वळ ढोंग!

Sanjay Raut : शासकीय कागद काहीही म्हणोत, अंमलबजावणी कधीच झाली नाही | सक्तीविरोधात राज आणि उद्धव ठाकरे खांद्याला खांदा लावून लढले | मुख्यमंत्र्यांच्या 'फायलीं'वर राऊतांची बोचरी टीका

व
विवेक

1 मिनट पठन

Devendra Fadnavis On Sanjay Raut

Sanjay Raut : शासकीय कागद काहीही म्हणोत, अंमलबजावणी कधीच झाली नाही | सक्तीविरोधात राज आणि उद्धव ठाकरे खांद्याला खांदा लावून लढले | मुख्यमंत्र्यांच्या 'फायलीं'वर राऊतांची बोचरी टीका

मुंबई :- विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळानेच हिंदी सक्तीचा निर्णय घेतल्याचे पुरावे सादर केल्यानंतर, संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्र्यांवर जोरदार पलटवार केला आहे. "मुख्यमंत्री म्हणून फडणवीस केवळ फायलींमधले कागद लोकांना दाखवत आहेत, मात्र त्या सक्तीविरोधात महाराष्ट्राने जो संघर्ष केला, त्यावर ते बोलायला तयार नाहीत," अशा शब्दांत राऊतांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचा समाचार घेतला.

त्रिभाषा सूत्रीचा दबाव दिल्लीतूनच!

संजय राऊत यांनी या वादाचे खापर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर फोडले आहे. त्रिभाषा सूत्रीचा दबाव केंद्राकडून राज्यांवर टाकला गेला आणि त्यातूनच हिंदी सक्तीचे प्रयत्न झाले, असा दावा राऊतांनी केला. "जेव्हा केंद्र सरकारने हिंदी लादण्याचा प्रयत्न केला, तेव्हा महाराष्ट्र, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांनी आवाज उठवला. त्या संघर्षात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी हातात हात घालून सक्तीविरोधात रणशिंग फुंकले होते, हे मुख्यमंत्र्यांनी सोयीस्करपणे विसरू नये," असे राऊत यांनी ठणकावून सांगितले.

कागद विरुद्ध जमिनीवरील संघर्ष

मुख्यमंत्र्यांनी दाखवलेल्या
कागदपत्रांवर भाष्य करताना राऊत म्हणाले की, सरकारी कागद काहीही म्हणोत, त्या निर्णयांची जमिनीवर कधीच अंमलबजावणी झाली नाही. "आम्ही असे खूप कागद दाखवू शकतो, पण लोकांच्या मनात काय आहे आणि जमिनीवर काय घडतंय, हे महत्त्वाचे आहे. फडणवीस जे गोष्टी आवर्जून सांगायला पाहिजेत, त्या सांगायला विसरतात. ज्याला ते निर्णय म्हणतात, त्याविरुद्धच आमचा संघर्ष सुरू होता," असे टीकास्त्र राऊतांनी सोडले.

उद्धव ठाकरे विधानपरिषदेत 'हिशोब' चुकते करणार?

संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या दाव्याला 'ढोंग' ठरवत आता चेंडू उद्धव ठाकरेंच्या कोर्टात टोलवला आहे. या प्रकरणावर आज उद्धव ठाकरे विधानपरिषदेत आपल्या भाषणातून सडेतोड उत्तर देतील, असे संकेत राऊतांनी दिले आहेत. मंत्रिमंडळाचे इतिवृत्त आणि त्यावेळची राजकीय परिस्थिती यावर ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

शेयर करें