मुख्य सामग्री पर जाएँ

Sangli News : सांगली जिल्हा बँक निवडणुकीत मोठा उलटफेर! अजित घोरपडेंचा 4 मतांनी विजय; गोपीचंद पडळकरांची दणदणीत एन्ट्री

Sangli News : सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

सांगली जिल्हा बँक निवडणुकीत मोठा उलटफेर! अजित घोरपडेंचा 4 मतांनी विजय; गोपीचंद पडळकरांची दणदणीत एन्ट्री
सांगली जिल्हा बँक निवडणुकीत मोठा उलटफेर! अजित घोरपडेंचा 4 मतांनी विजय; गोपीचंद पडळकरांची दणदणीत एन्ट्री

Sangli News : सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला आहे. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी शरद पवार गटाचे उमेदवार टी. व्ही. पाटील यांचा अवघ्या चार मतांनी पराभव करत विजय मिळवला. या निकालामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.https://maharashtramirror.com/ Sangli News

कवठे महाकाळ सोसायटी गटातून अजितराव घोरपडे यांना 37 मते मिळाली, तर टी. व्ही. पाटील यांना 33 मतांवर समाधान मानावे लागले. दुसरीकडे, मिरज सोसायटी गटातून खासदार विशाल पाटील यांचे समर्थक काँग्रेसचे अण्णासाहेब कोरे यांनी भाजप आमदार सुरेश खाडे यांचे समर्थक अनिल शेगुनशे यांचा पराभव केला.https://maharashtramirror.com/ Sangli News

पडळकरांची जिल्हा बँकेत एन्ट्री
या निवडणुकीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनीही दणदणीत विजय मिळवला. जत सोसायटी गटातून पडळकर यांना 54 मते मिळाली, तर महाविकास आघाडीचे विनोद पवार यांना 34 मते मिळाली. तब्बल 20 मतांनी विजय मिळवत पडळकरांनी जिल्हा बँकेत प्रवेश केला. त्यांच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्रावर जल्लोष केला.

सदाभाऊ खोतांचा जयंत पाटलांना टोला
पडळकरांच्या विजयानंतर आमदार सदाभाऊ खोत यांनी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला. जिल्हा बँक ही अलिबाबाची गुहा बनली होती. या प्रस्थापितांच्या वाड्याला पडळकरांच्या विजयाने तडा गेला असून, आता वाळव्याच्या गब्बर सिंगाने सावध व्हावे, असा टोला खोत यांनी लगावला. त्यामुळे सांगलीच्या राजकीय वर्तुळात या निकालाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेयर करें