Saamna Lekh : Saamna Lekh यांना डोहाळे लागले आहे ; सामना अग्रलेख
Saamna Lekh Target Amit Shah : फोडा, जोडा, पण निवडणुका जिंका, गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना कालमंत्र
1 मिनट पठन

Saamna Lekh Target Amit Shah : फोडा, जोडा, पण निवडणुका जिंका, गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना कालमंत्र
मुंबई :- देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा Amit Shah मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यादरम्यान भाजप पदाधिकारी तसेच महायुतीच्या पदाधिकारी आणि नेत्यांना मार्गदर्शन केले. अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या कार्यक्रमानंतर आता शिवसेना ठाकरेचे मुखपत्र असलेले सामना वृत्तपत्रातून जोरदार हल्ला करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे Uddhav thackeray आणि शरद पवार Sharad Pawar यांना राजकीय दृष्ट्या संपवण्याचे डोहाळे अमित शहा यांना लागल्याची टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. नाशिक मध्ये झालेल्या पदाधिकारी मेळाव्यात अमित शहा यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना फोडा पण निवडणुका जिंका असं कानमंत्र दिल्याचा गंभीर आरोप अग्रलेखातून Saamna Lekh केला आहे.

सामना वृत्तपत्राचा अग्रलेख जशास तसा
महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी व मराठी माणसाला कंगाल करण्यासाठी अमित शहा यांना शरद पवार व उद्धव ठाकरे यांना राजकीयदृष्ट्या खतम करायचे डोहाळे लागले आहेत. हे डोहाळे त्यांच्यावरच उलटतील. अमित शहांचे हे डोहाळे जेवण लाचार स्वाभिमानशून्य मिंधे टोळी करत आहे व त्यांना नाशकात हे डोहाळे लागले. नाशकात श्राद्ध, अंत्यसंस्कार, नारायण नागबळी यासारखे विधी केले जातात. शिवसेना वगैरे फोडण्याचे डोहाळे ज्यांना लागले आहेत त्यांचे क्रियाकर्म नाशकातील रामकुंडावरच करण्याचा निर्धार महऱ्हाटी जनतेने केला आहे. उद्धव ठाकरे व शरद पवारांचे पक्ष खतम करण्याविषयी जे बोलतात त्यांनाच नीट फोडून झोडले जाईल. महाराष्ट्रात सगळ्याच माजोरड्यांचा माज उतरवून मिळतो ! शहांना डोहाळे लागले ! या देशाचे पंतप्रधान सन्माननीय पंतप्रधानांसारखे वागत नाहीत. देशाचे गृहमंत्री शहा हेदेखील गृहमंत्रीपदाला साजेसे वागत नाहीत. देशाचे सरन्यायाधीश पदाचा आब राखत नाहीत. अशी विचित्र परिस्थिती देशात निर्माण झाली आहे. देशाचे व राज्याचे गृहमंत्रीच स्वतः कायदा धाब्यावर बसवत आहेत व त्यांच्या कार्यकर्त्यांना कायदा मोडण्यासाठी प्रेरणा देत आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी नाशकातील त्यांच्या दौऱ्यात भाजप पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला की, "फोडा, झोडा; पण निवडणुका जिंका." महाराष्ट्रात पराभवाच्या भीतीने भाजपचे हातपाय थरथरू लागले आहेत व स्वतः गृहमंत्री शहादेखील महाराष्ट्र हातचा जातोय या भयाने खचले आहेत. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना फोडा. त्यांचे बुथ स्तरावरील कार्यकर्ते फोडा व या पक्षांचा पाया जमीनदोस्त करा. काहीही करा, पण निवडणुका जिंका, असे अमित शहा यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना जाहीरपणे सांगितले. शहा यांची भाषा लोकशाहीला धरून तर नाहीच, पण किमान सभ्यपणाचीदेखील नाही. महाराष्ट्रात शिवसेना व राष्ट्रवादीचे आमदार, खासदार वगैरे पन्नास- पन्नास कोटींना सरळ विकत घेतले गेले. त्यातील काही जणांना ईडी, सीबीआयसारख्या तपास यंत्रणांचा दबाव टाकून फोडले. देशाचे गृहमंत्री अशा भ्रष्ट लोकांच्या मदतीने महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार चालवत आहेत व त्यांना संरक्षण देण्यासाठी पराकाष्ठा करीत आहेत. ४०-४० आमदार फोडूनदेखील महाराष्ट्रात भाजप आणि त्यांच्या मिंधे टोळीचा दारुण पराभव लोकसभा निवडणुकीत झाला. महऱ्हाटी जनतेने मोदी-शहांच्…
