मुख्य सामग्री पर जाएँ

Pune News : बुद्धिबळ स्पर्धेत रुद्रांश दाश विजेता सहा पैकी सहा सामने जिंकत निर्विवाद वर्चस्व

Pune News पुणे, महाराष्ट्र मिरर: एस डब्लू चेस अकादमीच्या वतीने आयोजित इंटर अकॅडमी इंटरमिजिएट लेव्हल ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत रुद्रांश दाश याने शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

बुद्धिबळ स्पर्धेत रुद्रांश दाश विजेता सहा पैकी सहा सामने जिंकत निर्विवाद वर्चस्व; कृषांग मिश्रा द्वितीय, शाश्वत डब्बिरू तृतीय
बुद्धिबळ स्पर्धेत रुद्रांश दाश विजेता सहा पैकी सहा सामने जिंकत निर्विवाद वर्चस्व; कृषांग मिश्रा द्वितीय, शाश्वत डब्बिरू तृतीय

Pune News : कृषांग मिश्रा द्वितीय, शाश्वत डब्बिरू तृतीय

Pune News पुणे, महाराष्ट्र मिरर: एस डब्लू चेस अकादमीच्या वतीने आयोजित इंटर अकॅडमी इंटरमिजिएट लेव्हल ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत रुद्रांश दाश याने शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील सहाही सामने जिंकत त्याने ६ पैकी ६ गुणांची परिपूर्ण कमाई केली. एस डब्लू चेस अकादमीचे संस्थापक सत्यम वारुडे यांच्या वतीने ३० ऑगस्ट रोजी लिंचनेस या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इंटरमिजिएट गटात नऊ खेळाडूंनी सहभाग घेतला. सुरुवातीपासूनच रुद्रांशने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखले.https://maharashtramirror.com/ Pune News

रुद्रांशने स्पर्धेतील सर्व सहा सामने जिंकले. एकही गुण न गमावता त्याने ६ पैकी ६ गुण मिळवत विजेतेपदावर आपले नाव कोरले. सातत्यपूर्ण खेळ, अचूक डावपेच आणि सामन्यावरील नियंत्रण ही त्याच्या कामगिरीची वैशिष्ट्ये ठरली. स्पर्धेत कृषांग मिश्रा याने द्वितीय, तर शाश्वत डब्बिरू याने तृतीय क्रमांक पटकावला. अध्विक रेड्डी चौथ्या आणि उर्विल खरचे पाचव्या स्थानावर राहिले. विजेत्या रुद्रांश दाश याला ट्रॉफी, तर अन्य चार क्रमांकांच्या खेळाडूंना पदके देण्यात आली.https://maharashtramirror.com/ Pune News

स्पर्धेनंतर आयोजक सत्यम वारुडे यांनी रुद्रांशच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक करत सर्व सहभागी खेळाडूंचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक बुद्धिबळाचा अनुभव मिळावा आणि नियमित स्पर्धांच्या माध्यमातून त्यांच्या खेळातील कौशल्य विकसित व्हावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

शेयर करें