मुख्य सामग्री पर जाएँ

Pune News : राष्ट्रवादीत रोहित पवारांवरून अंतर्गत धुसफूस

Pune News : कर्जत : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार गेल्या काही काळापासून शेतकरी, युवक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत आहेत.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

राष्ट्रवादीत रोहित पवारांवरून अंतर्गत धुसफूस
राष्ट्रवादीत रोहित पवारांवरून अंतर्गत धुसफूस


Pune News : कर्जत : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार गेल्या काही काळापासून शेतकरी, युवक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत आहेत. विविध प्रश्नांवरून ते सरकारला घेरत असून, या मुद्द्यांना वाचा फोडण्यासाठी राज्यभर दौरेही करत आहेत. https://maharashtramirror.com/ Pune News

रोहित पवारांकडून सातत्याने शेतकरी, युवक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवला जात आहे. बेरोजगारी, शिक्षण, शेतकऱ्यांच्या अडचणी तसेच युवकांच्या विविध प्रश्नांवर ते सरकारवर टीका करताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे कार्यकर्ते आणि समर्थकांचे लक्ष लागले आहे. मात्र, रोहित पवारांच्या या आक्रमक भूमिकेला पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून अपेक्षित प्रसिद्धी मिळत नसल्याची नाराजी पक्षातील काही कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. रोहित पवार विविध प्रश्नांवर सक्रिय असताना त्यांच्या आंदोलनांची आणि भूमिकांची पक्षाच्या अधिकृत माध्यमांवर पुरेशी दखल घेतली जात नसल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात रोहित पवारांच्या भूमिकेवरून अंतर्गत धुसफूस असल्याची चर्चा रंगली आहे. पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर याबाबत काय भूमिका घेतली जाते, तसेच रोहित पवारांच्या आक्रमक राजकीय भूमिकेला पक्षाकडून कितपत पाठिंबा मिळतो, याकडे आता लक्ष लागले आहे.

शेयर करें