मुख्य सामग्री पर जाएँ

पीपीपी माॅडेल अंतर्गत रस्त्यांच्या कामांची चौकशी करावी: उज्वल केसकर

या सर्व कामांची चौकशी करून ही रक्कम दुप्पट कशी झाली याचा तपशील द्यावा अशी मागणी त्यांनी केली

पघ
प्रशिक घस्ते

1 मिनट पठन

पीपीपी माॅडेल अंतर्गत रस्त्यांच्या कामांची चौकशी करावी: उज्वल केसकर

या सर्व कामांची चौकशी करून ही रक्कम दुप्पट कशी झाली याचा तपशील द्यावा अशी मागणी त्यांनी केली

निलेश राऊत
पुणे: महापालिकेतील प्रशासकीय राजवटीत क्रेडिट नोटच्या द्वारे पीपीपी तत्वावर रस्त्याची बांधणी केली गेली व सध्याही चालू आहे. मुळामध्ये हे पीपीपी मॉडेल कायदेशीर नाही, या विषयाच्या तपशीलात न जाता झालेले व सुरू असलेल्या कामांच्या तपशिलांची चौकशी होणे आवश्यक आहे. याबाबत महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना पत्र देऊन प्रस्तावित रस्त्यांच्या कामांची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

शहरात पीपीपी मॉडेल खाली एकूण २० रस्त्यांची कामे असून, ही सर्व कामे प्रशासकीय राजवटीच्या काळात दिली गेली आहेत. या सर्व कामांसाठी सल्लागार नेमले होते तर झालेली कामे तपासण्यासाठी देखील सल्लागार नेमले होते. या एकूण रस्त्याच्या कामाची लांबी ३९.०३ किलोमीटर असून, टेंडरची रक्कम तब्बल १ हजार २६ कोटी रुपये इतकी आहे. यात सरासरी प्रत्येक किलोमीटरचा दर २६ कोटी २८ लाख आहे. तर मनपा रस्त्याचा सरासरी दर हा १२ ते १३ कोटी रुपये इतका आहे. (स्पेसिफिकेशन नुसार कमी जास्त होऊ शकतो.) त्यामुळे या सर्व कामांची चौकशी करून ही रक्कम दुप्पट कशी याचा तपशील पुणेकरांसमोर आला पाहिजे असेही ते म्हणाले.

शेयर करें