मुख्य सामग्री पर जाएँ

Rekha Gupta : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर सार्वजनिक कार्यक्रमात हल्ला!

CM Rekha Gupta Latest News : गुन्ह्याचा हेतू स्पष्ट नाही; आरोपी गुजरातचा रहिवासी, नातेवाईकाला तुरुंगातून सोडवण्यासाठी मदत मागण्यासाठी आला होता, प्राथमिक माहिती.

व
विवेक

1 मिनट पठन

Rekha Gupta : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर सार्वजनिक कार्यक्रमात हल्ला!

CM Rekha Gupta Latest News : गुन्ह्याचा हेतू स्पष्ट नाही; आरोपी गुजरातचा रहिवासी, नातेवाईकाला तुरुंगातून सोडवण्यासाठी मदत मागण्यासाठी आला होता, प्राथमिक माहिती.

ANI :- राजधानी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर बुधवारी (20 ऑगस्ट) एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान धक्कादायक हल्ला झाला आहे. दिल्ली भाजपाने आयोजित केलेल्या एका जनसुनावणी (जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी सुरू केलेला साप्ताहिक उपक्रम) कार्यक्रमात ही घटना घडली. मुख्यमंत्री गुप्ता CM Rekha Gupta लोकांच्या समस्या ऐकत असतानाच एका व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला करत कानशिलात लगावली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

मुख्यमंत्र्यांवर हल्ला करणाऱ्या आरोपीला तात्काळ सिव्हिल लाइन्स पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची ओळख राजेशभाई खिमजीभाई साकरिया (वय 41) अशी पटली असून, तो गुजरातमधील राजकोट येथील रहिवासी आहे. पोलीस सध्या या हल्ल्यामागील नेमका हेतू काय आहे, याचा सखोल तपास करत आहेत.

नेमकं काय घडलं?

दिल्ली भाजपाचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी या घटनेची माहिती दिली. ते म्हणाले की, "आज सकाळी मुख्यमंत्री रेखा गुप्ता जनसुनावणी घेत असताना लोकांशी संवाद साधत होत्या. त्यावेळी एक तरुण त्यांच्याजवळ आला आणि त्याने काही कागदपत्रे दाखवली. मुख्यमंत्री गुप्ता ती कागदपत्रे पाहत असतानाच त्याने अचानक त्यांच्या कानशिलात लगावली."

हा प्रकार घडताच मुख्यमंत्री गुप्ता यांच्या कार्यकर्त्यांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत मुख्यमंत्र्यांचे डोके एका टेबलावर आदळल्याचेही सांगण्यात आले आहे. मात्र, कार्यकर्त्यांनी आणि उपस्थित लोकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत आरोपी राजेशभाई साकरियाने सांगितले की, तो त्याच्या एका नातेवाईकाला तुरुंगातून सोडवण्यासाठी मुख्यमंत्री गुप्ता यांची मदत मागण्यासाठी आला होता. सध्या पोलीस या माहितीची सत्यता पडताळून पाहत असून, अधिक माहितीसाठी राजकोट पोलिसांशीही संपर्क साधण्यात आला आहे. राजकीय वर्तुळात या घटनेचा तीव्र निषेध केला जात असून, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शेयर करें