मुख्य सामग्री पर जाएँ

Ravi Pujari : अखेर ‘डॉन’चा खेळ खल्लास! रवी पुजारी ठाणे पोलिसांच्या जाळ्यात१० कोटी खंडणी, गोळीबाराच्या धमक्या; परदेशातून माज मिरवणारा डॉन अखेर गार!

ठाणे:- विवेक राजेंद्र जगताप परदेशात बसून महाराष्ट्रात दहशतीचा कारभार चालवणारा कुख्यात डॉन रवी सुल्या पुजारी अखेर ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाच्या तावडीत सापडला.

व
विवेक

1 मिनट पठन

Ravi Pujari : अखेर ‘डॉन’चा खेळ खल्लास! रवी पुजारी ठाणे पोलिसांच्या जाळ्यात१० कोटी खंडणी, गोळीबाराच्या धमक्या; परदेशातून माज मिरवणारा डॉन अखेर गार!

ठाणे:- विवेक राजेंद्र जगताप
परदेशात बसून महाराष्ट्रात दहशतीचा कारभार चालवणारा कुख्यात डॉन रवी सुल्या पुजारी अखेर ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाच्या तावडीत सापडला.

वर्षानुवर्षे पोलिसांना चकवा देत “डॉनगिरी” मिरवणाऱ्या पुजारीचा आता खेळ खल्लास झाल्याचं स्पष्ट झालं आहे!

२०१७ मध्ये एका बांधकाम व्यावसायिकाकडून तब्बल १० कोटींची खंडणी मागत, “पैसे नाही दिले तर गोळ्या झाडू” अशी थेट धमकी देणाऱ्या या गुन्हेगाराने आपले हस्तक पाठवून कार्यालयावर गोळीबार घडवण्याचाही कट रचला होता.

परदेशात बसून दहशत, आता कोठडीत धडपड!

४४ पेक्षा अधिक गंभीर गुन्ह्यांत वॉन्टेड असलेला हा डॉन परदेशात लपून बसून गुन्हेगारी जाळं विणत होता.
रेड कॉर्नर नोटीस निघाल्यानंतरही तो पोलिसांच्या हाताबाहेरच होता —
पण शेवटी सेनेगलमध्ये पकडला गेला आणि प्रत्यार्पणानंतर ठाणे पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या!

ठाणे पोलिसांचा दणका; डॉनचा माज उतरला!

१७ मार्च २०२६ रोजी बेंगळुरू कारागृहातून ताब्यात घेतल्यानंतर त्याला थेट अटक करण्यात आली.
विशेष मोक्का न्यायालयाने त्याला २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
“परदेशात बसून महाराष्ट्रात दहशत माजवणाऱ्यांचा शेवट असा होतो!”
रवी पुजारीसारख्या डॉनच्या अटकेने अंडरवर्ल्डच्या ‘फोनवरील दहशतीला’ मोठा धक्का बसला आहे.
ठाणे पोलिसांनी दिलेला हा दणका म्हणजे गुन्हेगारी जगतात थेट इशारा आहे —
“कायद्याच्या हातातून कुणीही सुटत नाही!”

शेयर करें