मुख्य सामग्री पर जाएँ

Pimpari Crime : रावेतमध्ये पाण्याच्या टँकरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू ; टँकर चालकावर गुन्हा

Pimpari News : पिंपरी: बेदरकारपणे टँकर चालवून दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याने एका २१ वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पुनावळे गावठाण येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर घडली.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

रावेतमध्ये पाण्याच्या टँकरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
रावेतमध्ये पाण्याच्या टँकरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

Pimpari Crime : टँकर चालकाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत हयगयीने चालवले वाहन

Pimpari News : पिंपरी: बेदरकारपणे टँकर चालवून दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याने एका २१ वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पुनावळे गावठाण येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर घडली.https://maharashtramirror.com/ Pimpari crime

निखिलसिंग प्रविणसिंग सिसोदिया (वय २२, रा. दिघी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ९ सप्टेंबर रोजी पहाटे २.३० वाजताच्या सुमारास त्यांचा मित्र अर्पित प्रविणसिंग येवतिकर (वय २१) हा दुचाकीने (क्र. एम.एच. १४ एन.एन. ९५८३) जात होता. दर्शले चौकाकडून येणाऱ्या टाटा कंपनीच्या १० टायरी पाण्याच्या टँकरच्या (क्र. एम.एच. १७ ए.जी. ५५७६) चालकाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत व हयगयीने वाहन चालवून अर्पितच्या दुचाकीला समोरून उजव्या बाजूस जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात अर्पितच्या डोक्याला जबर दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला

अपघात घडवल्यानंतर टँकर चालक महादेव रमाकांत किडे (वय ३५, सध्या रा. बालेवाडी, मूळ रा. लातूर) याच्याविरुद्ध रावेत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६(१), २८१, ३२४(४) सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १७७/१३४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक आवरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.https://maharashtramirror.com/ Pimpari crime

शेयर करें