Kohlapur News : ऊसदरासाठी राजू शेट्टींचा महामार्गावर ठिय्या; दूध-भाजीपाला रोखण्याचा इशारा
Kohlapur News : कोल्हापूर : उसाला योग्य दर मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेले आंदोलन दुसऱ्या दिवशीही तीव्र झाले आहे.
1 मिनट पठन

Kohlapur News :किणी टोलनाक्यावर २१ तासांपासून आंदोलन : शेतकऱ्यांना ऊसतोड व वाहतूक बंद ठेवण्याचे आवाहन

Kohlapur News : कोल्हापूर : उसाला योग्य दर मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेले आंदोलन दुसऱ्या दिवशीही तीव्र झाले आहे. कोल्हापूरमधील पुणे-बंगळुरू महामार्गावर आंदोलनकर्त्यांनी ठिय्या मांडल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. किणी टोलनाक्यावर संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी गेल्या २१ तासांपासून आंदोलनाला बसले आहेत. ऊसदराचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला असून, आता मुंबईसह मोठ्या शहरांकडे जाणारा दूध आणि भाजीपाल्याचा पुरवठा रोखण्याचा इशाराही दिला आहे.https://maharashtramirror.com/ Kohlapur News
आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी राजू शेट्टी यांनी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना ऊसतोड थांबवण्याचे आवाहन केले आहे. आजपासून एक कांडीसुद्धा कारखान्याला पुरवू नका. शेतातील ऊस शेतातच राहू द्या आणि गावातून उसाची वाहतूकही होऊ देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले. कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी, असेही ते म्हणाले.https://maharashtramirror.com/ kohlapur News
एमएसपी समितीच्या दौऱ्याला मुकल्याची खंत
साखरेच्या किमान विक्री किमतीचा मुद्दाही शेट्टी यांनी उपस्थित केला. केंद्र सरकारने गेल्या सात वर्षांपासून साखरेची एमएसपी वाढवलेली नसल्याचे सांगत, या मागणीसाठी प्रयत्न करून तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यास भाग पाडल्याचा दावा त्यांनी केला. या समितीचा पुण्यात दौरा होता. साखरेची एमएसपी का वाढवली पाहिजे, याबाबत समितीसमोर सविस्तर भूमिका मांडण्यासाठी आपण जाणार होतो. मात्र, कारखानदारांच्या भूमिकेमुळे महामार्गावर आंदोलनाला बसावे लागल्याने समितीसमोर शेतकऱ्यांची बाजू मांडता आली नाही, अशी खंत शेट्टी यांनी व्यक्त केली. समितीसमोर शेतकऱ्यांची बाजू पोहोचली नाही, तर त्याला कारखानदार जबाबदार असतील, असा इशाराही त्यांनी दिला.https://maharashtramirror.com/ kohlapur News
‘शेतकऱ्यांची दखल नाही, मग दूध-भाजीपाला कशाला?’
आंदोलनाला २१ तास उलटूनही सरकारचा प्रतिनिधी किंवा स्थानिक प्रशासनातील अधिकारी भेटायला आले नसल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. शेतकऱ्यांना प्रशासनाकडून बेदखल केले जात असेल, तर शेतकऱ्यांचे दूध आणि भाजीपाला शहरांना कशासाठी हवा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला
मुंबईकडे जाणारा पुरवठा रोखण्याचा इशारा
ऊसदराच्या प्रश्नावर सरकारने तातडीने तोडगा काढला नाही, तर मुंबईसह मोठ्या शहरांकडे जाणारा दूध आणि भाजीपाल्याचा पुरवठा रोखण्यात येईल, असा थेट इशारा शेट्टी यांनी दिला आहे. त्यामुळे आंदोलनाचा परिणाम आता ऊस वाहतुकीपुरता मर्यादित न राहता शहरांच्या अन्नपुरवठ्यावरही होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
