Kohlapur News : ऊसदरासाठी राजू शेट्टींचा किणी टोलनाक्यावर चक्काजाम! पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; ४५०० रुपये पहिल्या उचलीची मागणी
Kohlapur News :कोल्हापूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आंदोलन तीव्र केले आहे.
1 मिनट पठन

Kohlapur News :कोल्हापूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आंदोलन तीव्र केले आहे. मंगळवारी (३ नोव्हेंबर) त्यांच्या नेतृत्वाखाली पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोलनाक्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी महामार्गावर ठिय्या मांडल्याने परिसरातील वाहतूक ठप्प झाली.https://maharashtramirror.com/ Kohlapur News
उसाला प्रतिटन ४ हजार ५०० रुपये पहिली उचल मिळावी, अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची प्रमुख मागणी आहे. ऊसदराचा प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठका झाल्या. मात्र, या बैठकांमधून कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. त्यामुळे आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला.https://maharashtramirror.com/ Kohlapur News
राजू शेट्टी यांनी कारखानदारांना स्पष्ट इशारा देत, दर जाहीर केल्याशिवाय उसाचे गाळप होऊ देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. साखरेचे दर आणि उपपदार्थांपासून कारखान्यांना मिळणारे उत्पन्न वाढत असताना शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर किणी टोलनाका परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. तब्बल ३०० हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त असल्याचे वृत्त आहे. ऊसदराची मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे. त्यामुळे आता साखर कारखानदार आणि शासन यावर काय तोडगा काढणार, याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
