मुख्य सामग्री पर जाएँ

Sangli News : ऊसाला ४ हजार ५०० रुपये पहिली उचल मिळेपर्यंत माघार नाही राजू शेट्टींचा साखर कारखानदारांना इशारा

Sangli News :सांगली : ऊसाला प्रतिटन ४ हजार ५०० रुपये पहिली उचल मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा ठाम इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी साखर कारखानदार आणि राज्य सरकारला दिला आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

ऊसाला ४ हजार ५०० रुपये पहिली उचल मिळेपर्यंत माघार नाही राजू शेट्टींचा साखर कारखानदारांना इशारा
ऊसाला ४ हजार ५०० रुपये पहिली उचल मिळेपर्यंत माघार नाही राजू शेट्टींचा साखर कारखानदारांना इशारा

Sangli News :सांगली : ऊसाला प्रतिटन ४ हजार ५०० रुपये पहिली उचल मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा ठाम इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी साखर कारखानदार आणि राज्य सरकारला दिला आहे. साखर कारखानदारांनी पहिली उचल जाहीर न करताच गळीत हंगाम सुरू करून कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर आजपासून छावणी आंदोलन सुरू करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.https://maharashtramirror.com/ Sangli News
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात आली. ज्या परिसरात साखर कारखाने सुरू आहेत, त्या भागातील प्रमुख मार्गांवर शेतकऱ्यांच्या छावण्या उभारून ऊस वाहतूक रोखण्यात येणार आहे. उसाने भरलेली एकही ट्रॉली किंवा ट्रक कारखान्याकडे जाऊ दिला जाणार नाही, असा निर्धार संघटनेने व्यक्त केला.
साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या उसाला किती पहिली उचल देणार, हे स्पष्ट न करताच कारखाने सुरू केले आहेत. उसाचा दर निश्चित करताना पारदर्शकता ठेवली जात नसल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला. वर्षभर कष्ट करून पिकवलेल्या उसाचा दर शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निश्चित केला पाहिजे, असे ते म्हणाले.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेयर करें