मुख्य सामग्री पर जाएँ

Kohlapur News : उसाला प्रतिटन ५५०० रुपये द्या; राजू शेट्टी आक्रमक

Kohlapur News : कोल्हापूर: यंदाच्या गाळप हंगामात उसाला प्रतिटन ५५०० रुपये दर मिळावा, साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) ५० रुपये आणि इथेनॉलचा दर ७० रुपये करण्यात यावा, या मागण्यांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

उसाला प्रतिटन ५५०० रुपये द्या; राजू शेट्टी आक्रमक
उसाला प्रतिटन ५५०० रुपये द्या; राजू शेट्टी आक्रमक

Kohlapur News : वळसे पाटलांच्या टीकेला प्रत्युत्तर; साखरेची एमएसपी ५०, इथेनॉलचा दर ७० रुपये करण्याची मागणी

Kohlapur News : कोल्हापूर: यंदाच्या गाळप हंगामात उसाला प्रतिटन ५५०० रुपये दर मिळावा, साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) ५० रुपये आणि इथेनॉलचा दर ७० रुपये करण्यात यावा, या मागण्यांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. उसाच्या दरावरून माजी मंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांनी केलेल्या टीकेला शेट्टी यांनी तीव्र शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे गाळप हंगामाच्या तोंडावर ऊसदराचा मुद्दा तापला आहे.https://maharashtramirror.com/ Kohlapur News
उसाला प्रतिटन ५५०० रुपये देण्याच्या शेट्टी यांच्या मागणीवर वळसे पाटील यांनी, “उसाला एवढा दर द्यायला काय तुमच्या काकांनी पैसे ठेवलेत का?” असा उपरोधिक सवाल केल्याचे सांगण्यात आले. त्याला प्रत्युत्तर देताना शेट्टी यांनी राष्ट्रीय आणि राज्य साखर संघाच्या नेतृत्वावरही प्रश्न उपस्थित केले. “यंदाच्या गाळप हंगामात उसाला प्रतिटन ५५०० रुपये दर मिळावा, ही शेतकऱ्यांची रास्त मागणी आहे. साखरेची किमान विक्री किंमत ५० रुपये आणि इथेनॉलचा दर ७० रुपये करा, अशी स्पष्ट मांडणी आम्ही केली आहे,” असे शेट्टी म्हणाले. साखरेची किमान विक्री किंमत गेल्या आठ वर्षांत वाढली नसल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी वळसे पाटील यांच्यावर टीका केली. ऊसदर जाहीर न करता ऊसतोड सुरू करण्यालाही शेट्टी यांनी तीव्र विरोध दर्शवला.
दिल्लीतल्या बैठकीत तोडगा नाही
नवी दिल्लीतील राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्रात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत साखर उद्योग आणि शेतकरी प्रतिनिधींची बैठक झाली. मात्र, शेतकऱ्यांच्या मागण्यांवर केंद्र सरकारकडून ठोस निर्णय झाला नसल्याचा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेने आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः साखरेची एमएसपी आणि इथेनॉलच्या दरात वाढ करण्याची मागणी संघटनेने केंद्रस्थानी ठेवली आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/



शेयर करें